AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड : पतीने पत्नीचा छळ केला, त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली. आत्महत्या केलेल्या पतीचं नाव जय तेलवानी तर अटकेतील पत्नीचं नाव तृप्ती तेलवानी असं आहे. 13 नोव्हेंबरला जय ने आत्महत्या केली होती. […]

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

पिंपरी-चिंचवड : पतीने पत्नीचा छळ केला, त्या छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकतो. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली. आत्महत्या केलेल्या पतीचं नाव जय तेलवानी तर अटकेतील पत्नीचं नाव तृप्ती तेलवानी असं आहे. 13 नोव्हेंबरला जय ने आत्महत्या केली होती. जयच्या कुटुंबीयांनी तृप्तीच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत तृप्तीला अटक केली. तृप्तीला पैसे खर्च करण्याची सवय होती. यासाठी तिने जयला कर्ज काढायला भाग पाडलं. पैशांची पूर्तता न केल्यास ती शिवीगाळ करून मारहाण करत असे, तसेच स्वतःचं बरं-वाईट करून घेण्याची धमकीही देत असे, अशी तक्रार जयच्या घरच्यांनी केली. व्हिडीओ अॅप्लिकेशनमध्ये कोणत्याही चित्रपटाआधी कॅन्सरचा दिला जाणारा संदेश तिने जयला म्हणायला लावला आणि तो स्वतःच त्याला कॅन्सर झाल्याचं सांगतोय असं या व्हिडीओत भासवले. तो व्हिडीओ ती जयच्या मित्रांना दाखवत असे. प्रेम विवाहानंतर वर्षभर सुखाचा संसार झाला, मात्र मार्च 2018 पासून तृप्तीने पैशासाठी जयचा अशाप्रकारे छळ केल्याचा आरोप जयच्या आईने केले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी तृप्तीला अटक केली आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला