AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर, यंदा सरासरी 100 टक्के पाऊस, केरळमध्ये 1 जूनला मान्सून धडकणार, IMD चा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD Monsoon forecast). काहीसा दिलासा दिला आहे. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

खुशखबर, यंदा सरासरी 100 टक्के पाऊस, केरळमध्ये 1 जूनला मान्सून धडकणार, IMD चा अंदाज
| Updated on: Apr 15, 2020 | 2:18 PM
Share

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना, तिकडे भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) काहीसा दिलासा दिला आहे. (IMD Monsoon forecast) आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.(IMD Monsoon forecast).

IMD ने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. मान्सून यंदा सरासरी 100 टक्के होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. जरी हा पहिला अंदाज असला तरी त्यामध्ये बदल होऊ शकतो. मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असाही अंदाज IMD ने वर्तवला. मात्र यामध्ये 3 ते 7 दिवस पुढे-मागे होऊ शकतात, असेही संकेत आहेत.

दक्षिण पश्चिम मान्सून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात बरसतो. केरळमधून मान्सूनला सुरुवात होऊन, पुढे तो देशभर पसरतो. आयएमडीच्या या अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या देश कोरोनाच्या संकटात असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. कृषी कामांना परवानगी असली तरी त्यासंबंधी व्यवहार काहीसे बंद असल्याने त्याचा फटका शेतीला बसला आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी IMD चा अंदाज काय होता? भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडीने (India Meteorological Department) गेल्या वर्षी 15 एप्रिल 2019 रोजी अंदाज वर्तवताना शेतकऱ्यांना खुशखबर दिली होती. त्यावेळी मान्सून सामान्य राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हा पहिला अंदाज होता.

2018 मधील पाऊस भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं. 2018 मध्ये जुलै, सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी 91 टक्के होती. त्यावेळी हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. 2018 मध्ये पाऊस कमी झाल्यामुळे अनेक भागात दुष्काळाचं चित्र होतं.

संबंधित बातम्या 

भारतीय हवामान विभागाची खुशखबर, यंदा मान्सून सामान्य

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.