एटीएम, क्रेडिट-डेबिट कार्डाचे नियम ते सिलेंडरचे दर, 1 मार्चपासून बदलणार पाच नियम

एक मार्च म्हणजेच उद्यापासून अनेक बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या रोजच्या कामांवर परिणाम होणार आहे.

एटीएम, क्रेडिट-डेबिट कार्डाचे नियम ते सिलेंडरचे दर, 1 मार्चपासून बदलणार पाच नियम
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 7:51 PM

मुंबई : एक मार्च म्हणजेच उद्यापासून अनेक (Important Changes From 1st March) बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या रोजच्या कामांवर परिणाम होणार आहे. या नवीन बदलांमुळे तुम्हाला काही बाबतीत मदत होणार आहे. मात्र, जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीच, तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. यामध्ये गॅस सिलेंडरचे भाव, एटीएममधून पैसे काढण्याचे नियम, बँक खात्यात केव्हायसी, जीएसटी, डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधित नियम इत्यादिंचा समावेश आहे.

एटीएममध्ये 2,000 रुपयांचे नोटा मिळणार नाही

1 मार्च 2020 पासून बँकेने 2,000 रुपयांच्या नोटेसंबंधी एक (Important Changes From 1st March) मोठा बदल केला आहे. आता ग्राहकांना एटीएममध्ये 2,000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा टाकणार नसल्याचा निर्णय इंडियन बँकेने घेतला आहे. त्यासाठी बँकेने सर्व शाखांना सूचना दिल्या आहेत.

2,000 रुपयांच्या नोटा बँकेत उपलब्ध असतील

बँकेच्या शाखांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा उपलब्ध असतील. म्हणजेच बँकेतून पैसे काढताना ग्राहकांना 2,000 रुपयांच्या नोटा मिळू शकतील.

मात्र, हा निर्णय फक्त एका बँकेने घेतला आहे. इंडियन बँकेव्यतिरिक्त कुठल्याही सरकारी किंवा खासगी बँकेने एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा निर्णय घेतलेला नाही.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती बदलणार

1 मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल होतो. फेब्रुवारी महिन्यात 12 तारखेला या दरात बदल करण्यात आला होता. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाच्या सिलेंडर 144.50 रुपयांनी महागला. याची किंमत 858.50 रुपये इतकी झाली. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 829.50 रुपये आहे.

लॉटरीवर 28 टक्के जीएसटी

लॉटरीवर 1 मार्च 2020 पासून 28 टक्के जीएसटी लागणार आहे. महसूल विभागाच्या नवीन नियमानुसार, लॉटरीवर केंद्रीय कराचा दर 14 टक्के झाला आहे आणि राज्य सरकारही सामान्य दराने कराची वसुली करेल. त्यामुळे लॉटरीवरील जीएसटी हा 28 टक्क्यांवर पोहोचेल.

कार्डने व्यवहाराच्या मर्यादेत बदल होण्याची शक्यता

आरबीआयने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट कार्डसंबंधी नवे नियम जारी केले आहेत. तसेच, बँकांना भारतात कार्ड जारी करताना फक्त एटीएम आणि पॉईंट ऑफ सेलमध्ये फक्त घरगुती कार्ड वापरण्यास परवानगी देण्यास सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी ग्राहकांना परवानगी घ्यावी लागेल. त्याशिवाय, ऑनलाईन, कार्ड नसताना आणि संपर्करहित व्यवहारांसाठी कार्ड सेवा वेगळ्याने सेट कराव्या लागतील. हे नवे नियम 16 मार्च 2020 पासून लागू होतील. याअंतर्गत जूनं कार्ड असलेले ग्राहक त्यांना कुठली सुविधा ठेवायची आहे आणि कुठली नाही हे ठरवू शकतात. ग्राहक 24/7 त्यांच्या व्यवहारांच्या मर्यादेत बदल करु शकतात.

SBI खाताधारकांसाठी महत्त्वाची बातमी

भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) खातेधारकांना एसएमएस पाठवत माहिती दिली आहे की, त्यांना केव्हायसी करने बंधनकारक असेल. बँकेने सांगितलं की, जर केव्हायसी निश्चित काळात केली नाही, तर तुमचं खातं बंदही होऊ शकतं.

केव्हायसीसाठी मतदान ओळख पत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड, पोस्टातून जारी करण्यात आलेलं ओळख पत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, टेलीफोन बिल, वीज बिल, बँक खाते रिपोर्ट, रेशन कार्ड, क्रेडिट कार्ड रिपोर्ट इत्यादीपैंकी कुठलंही (Important Changes From 1st March) एक कागदपत्र सादर करावे लागतात.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.