महिलांसाठी रेल्वेत आता खास ‘Talk Back’ बटण

मुंबई : भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांच्या सुविधांसाठी नवनवीन योजना आणत असते. प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास हा अधिक सोयिस्कर कसा करता येईल यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत असते. रेव्ले प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेला बघता गाड्यांच्या डब्यांमध्ये ‘Talk Back’ बटणची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या ही सुविधा पायलट प्रोजेक्ट तत्वावर चालवली जात आहे. जर हा प्रकल्प यशस्वी ठरला […]

महिलांसाठी रेल्वेत आता खास ‘Talk Back’ बटण
लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: May 22, 2019 | 10:52 PM

मुंबई : भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांच्या सुविधांसाठी नवनवीन योजना आणत असते. प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास हा अधिक सोयिस्कर कसा करता येईल यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत असते. रेव्ले प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेला बघता गाड्यांच्या डब्यांमध्ये ‘Talk Back’ बटणची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या ही सुविधा पायलट प्रोजेक्ट तत्वावर चालवली जात आहे. जर हा प्रकल्प यशस्वी ठरला तर सर्व गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.

यापूर्वी 2016 मध्ये रेल्वेने महिलांच्या डब्यात पायलट प्रोजेक्ट तत्वावर ‘Talk Back’ बटणची सुविधा सुरु केली होती. यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये अनेक गाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात आली होती.

‘Talk Back’ बटण काय आहे?

पश्चिम रेल्वेने लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये ‘Talk Back’ बटणची सुविधा सुरु केली आहे. याअंतर्गत महिला प्रवासी कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये गाडीचा गार्ड आणि मोटर मनशी ‘Talk Back’ बटणच्या सहाय्याने संपर्क साधू शकते. आतापर्यंत पश्चिम रेल्वेकडून 70 पेक्षा जास्त महिला डब्यांमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.

या सुविधेचा चुकीचा वापर होऊ नये, यासाठी रेल्वेने रेकॉर्डिंगचीही व्यवस्था केली आहे. गार्ड आणि मोटरमनशी झालेल्या संवादाची रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच, कुठल्या दुर्घटनेच्या परिस्थितीत या संवादाचा पुराव्याच्या रुपात वापर होऊ शकतो.

एकीकडे, संबंधित महिला आणि गार्ड किंवा मोटर मनशी झालेला संवाद रेकॉर्ड केला जातो. तर, दुसरीकडे डब्यामध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने या बटणवर पहारा ठेवला जाणार आहे.

भारतीय रेल्वेने प्रवासी महिलांच्या सुरक्षेकरिता उचलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे. रेल्वेच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सोयिस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.