भारतातील अनेक अब्जाधीशांची स्थलांतरासाठी ‘या’ देशाला पसंती

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था आणि जीडीपी वेगाने वाढत आहे. पण देशातील अब्जाधीश मात्र राहण्यासाठी दुसरा देश निवडत आहेत. ‘Global Wealth Migration Review’ (GWMR) 2019 या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. AfrAsia Bank आणि न्यू वर्ल्ड हेल्थ यांच्या संशोधनानुसार, भारतातील दोन टक्के अब्जाधीशांनी 2018 या वर्षामध्ये भारतातून स्थलांतर केलंय. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती सहा […]

भारतातील अनेक अब्जाधीशांची स्थलांतरासाठी 'या' देशाला पसंती
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था आणि जीडीपी वेगाने वाढत आहे. पण देशातील अब्जाधीश मात्र राहण्यासाठी दुसरा देश निवडत आहेत. ‘Global Wealth Migration Review’ (GWMR) 2019 या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. AfrAsia Bank आणि न्यू वर्ल्ड हेल्थ यांच्या संशोधनानुसार, भारतातील दोन टक्के अब्जाधीशांनी 2018 या वर्षामध्ये भारतातून स्थलांतर केलंय. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती सहा हजार दशलक्ष एवढी आहे.

स्थलांतराच्या बाबतीत भारत हा चीन आणि रशिया यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटेनमध्ये ब्रेक्झिट प्रकरण सुरु असतानाही ब्रिटेनलाच स्थलांतरासाठी पसंती देण्यात आली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे चीनमधून सर्वात जास्त स्थलांतर झालंय.

विशेष म्हणजे स्थलांतरासाठी सर्वाधिक पसंती दिलेल्या देशामध्ये अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. यामागचं कारणही तसंच आहे. चांगलं वातावरण, शिक्षणाचा दर्जा, विद्यापीठे, शाळा, आरोग्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर व्यवस्था ही विविध कारणे आहेत.

जाणकारांच्या मते, पैशांच्या बाबतीत भारतातील अब्जाधीश जर्मनी आणि ब्रिटेनलाही मागे टाकू शकतात. कारण, अर्थव्यवस्था वाढीचा वेग पाहता जर्मनी आणि ब्रिटेनला मागे टाकणं सहज शक्य आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरी पायाभूत सुविधा आणि चांगलं वातावरण पाहता श्रीमंतांची पाऊलं विकसित राष्ट्रांकडे वळत आहेत.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.