AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 30 April 2024 : सोन्याची आनंदवार्ता, चांदीने दिला दिलासा, भाव तरी काय

Gold Silver Rate Today 30 April 2024 : अक्षय तृतीया तोंडावर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. तरीही मार्च-एप्रिलमध्ये भडकलेल्या किंमतींनी ग्राहकांची मोठी निराशा केली आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेवर ग्राहकांच्या नाराजीचे सावट असू शकते.

Gold Silver Rate Today 30 April 2024 : सोन्याची आनंदवार्ता, चांदीने दिला दिलासा, भाव तरी काय
Gold And Silver Price
| Updated on: Apr 30, 2024 | 8:38 AM
Share

मार्च नंतर एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान फटकेबाजी केली. सर्वकालीन रेकॉर्ड याच महिन्यात नोंदविला गेला. गेल्यावर्षी सुद्धा एप्रिल आणि मे महिन्यात भाव वधारले होते. अक्षय तृतीया आता तोंडावर आहे. तर एप्रिल महिना संपणार आहे. या महिन्यात किंमती भडकल्याने ग्राहकांनी गरजेपुरती खरेदी केली. पण कमाल किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. अक्षय तृतीयेवर या नाराजीचे सावट असू शकते. World Gold Council नुसार, किंमतींचा एकच भडका उडाल्याने मागणीवर त्याचा परिणाम दिसू शकतो. एप्रिलच्या अखेरच्या सत्रात अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 30 April 2024)

अखेरच्या सत्रात चढउताराचे सत्र

गेल्या आठवड्यात सोने 2400 रुपयांनी उतरले तर 1150 रुपयांनी महागले. एप्रिलच्या अखेरीस सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. एप्रिलचा दरवाढीचा आलेख पाहता अखेरच्या सत्रात ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे दिसून येते. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 30 एप्रिल रोजी सोने 300 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने घेतली माघार

एप्रिलच्या अखेरच्या सत्रात चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दोन आठवड्यात चांदीने माघार घेतली. गेल्या आठवड्यात एकदाच चांदीने 2 हजारांची उसळी घेतली. तर 4500 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीच्या किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,373 रुपये, 23 कॅरेट 72,083 रुपये, 22 कॅरेट सोने 66,294 रुपये झाले. 18 कॅरेट 54,280 रुपये, 14 कॅरेट सोने 42,339 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,128रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!