‘मदर्स डे’ला इरोम शर्मिला यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला

बंगळुरु : आयरन लेडी ऑफ मणिपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इरोम चानू शर्मिला यांनी मातृत्त्व दिनाला जुळ्या मुलींना जन्म दिला. बंगळुरु येथील क्लाऊडनाईन रुग्णालयाच्या मल्लेश्वरम शाखेत त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. नागरी अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. शर्मिला आणि त्यांचे पती डेसमॉन्ड कोटिन्हो यांनी मुलींचं नाव निक्स सखी आणि ऑटम तारा असं ठेवलं […]

'मदर्स डे'ला इरोम शर्मिला यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

बंगळुरु : आयरन लेडी ऑफ मणिपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इरोम चानू शर्मिला यांनी मातृत्त्व दिनाला जुळ्या मुलींना जन्म दिला. बंगळुरु येथील क्लाऊडनाईन रुग्णालयाच्या मल्लेश्वरम शाखेत त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. नागरी अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. शर्मिला आणि त्यांचे पती डेसमॉन्ड कोटिन्हो यांनी मुलींचं नाव निक्स सखी आणि ऑटम तारा असं ठेवलं आहे. शर्मिला यांची पहिली मुलगी निक्स सखीचं नाव त्यांच्या आई इरोम सखी यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. इरोम सखी यांचं काहीच काळापूर्वी निधन झालं होतं.

“शर्मिला यांची प्रकृती आता स्थिरावत आहे. लवकरच त्यांच्या मुलींचे फोटो सार्वजनिक केले जाईल. शर्मिला यांनी सी सेक्शन डिलीव्हरीच्या माध्यमातून मुलींना जन्म दिला”, असं क्लाऊडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. “मातृत्त्व दिनाच्या दिवशी मुलींना जन्म देणे हा निव्वळ संयोग आहे. हे पूर्वनियोजित नव्हतं. आम्ही पुढील आठवड्यात शर्मिला यांची प्रसुती करणार होतो. मात्र, शनिवारी रात्री त्यांना प्रसुतीकळा होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी सकाळी 9.20 वाजता त्यांनी जुळ्या मुलींचा जन्म दिला. येत्या मंगळवार, बुधवारपर्यंत शर्मिला यांना रुग्णालयातून सुट्टी मिळेल”, असे डॉ. श्रीपाद विनेकर यांनी सांगितलं.

इरोम शर्मिला यांनी 16 वर्षांपर्यंत राज्यातील सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याविरोधात (एएफएसपीए) उपोषण केलं होतं. 2000 मध्ये त्यांनी उपोषणाला सुरवात केली होती. ऑगस्ट 2016 मध्ये त्यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर त्या पती डेसमॉन्ड कोटिन्हो यांच्यासोबत कोडईकनल येथे गेल्या. गर्भवती असताना त्या बंगळुरु येथे आल्या आणि इथेच त्यांनी दोन गोडंस जुळ्या मुलींना जन्म दिला.

“ही एका नव्या आयुष्याची सुरुवात आहे. माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. मी खूप आनंदी आहे. माझी आणि डेसमॉन्ड यांनी कधीही मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी अशी इच्छा ठेवली नाही. आमचं होणारं बाळ हे स्वस्थ असावं एवढीच आमची इच्छा होती”, अशी प्रतिक्रिया इरोम शर्मिला यांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.