AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रो संशोधकाच्या हत्येचं गूढ उकललं, गे पार्टनरकडून हत्या!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोतील (ISRO Scientist murder) संशोधकाच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. समलिंगी संबंधातून गे पार्टनरने एस सुरेश (ISRO Scientist murder) यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

इस्रो संशोधकाच्या हत्येचं गूढ उकललं, गे पार्टनरकडून हत्या!
| Updated on: Oct 05, 2019 | 10:51 AM
Share

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोतील (ISRO Scientist murder) संशोधकाच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. समलिंगी संबंधातून गे पार्टनरने (gay sex) एस सुरेश (ISRO Scientist murder) यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 1 ऑक्टोबरला 56 वर्षीय एस सुरेश यांची हैदराबादेतील राहत्या घरी हत्या झाली होती.

पोलिसांनी तातडीने तपास करत 39 वर्षीय जनगामा श्रीनिवास (Janagama Srinivas) या आरोपीला अटक केली. आरोपी एका खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो. समलिंगी संबंधाच्या बदल्यात पैशावरुन झालेल्या वादातून ही हत्या झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, आरोपी श्रीनिवास आणि संशोधक सुरेश कुमार यांच्यात समलिंगी संबंध होते. श्रीनिवास हा शारीरिक संबंधांच्या बदल्यात सुरेश कुमार यांच्याकडून पैसे घेत असे. 30 ऑक्टोबरला आरोपी हा सुरेश कुमारांच्या घरी चाकू घेऊन गेला होता.

हत्या झाली त्या दिवशी दोघांमध्ये संबंध झाले. त्यानंतर आरोपीने पैशाची मागणी केली. पैशावरुन दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने आणलेल्या चाकूने सुरेश यांच्यावर हल्ला करुन त्यांची हत्या केली.

20 वर्षापासून हैदराबादेत

एस सुरेश हे मूळचे केरळचे होते. संशोधक सुरेश कुमार हे गेल्या 20 वर्षापासून हैदराबादेत राहेत होते. हैदराबादेतील उच्चभ्रू परिसरातील अमीरपेट (ISRO Scientist murder) इथल्या अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये ते एकटेच राहात होते. सुरेश हे इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये (National Remote Sensing Centre – NRSC) कार्यरत होते. मंगळवारी ते कार्यालयात न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना मोबाईलवर कॉल केला. मात्र त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्यात आला. पत्नी चेन्नईतील बँकेत कार्यरत आहे. सुरेश कुमार यांचा मुलगा अमेरिकेत तर मुलगी दिल्लीत राहते.

संबंधित बातम्या 

इस्रोच्या संशोधकाची घरात घुसून हत्या, हैदराबादमध्ये खळबळ  

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.