AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईचा शब्द पाळला, दशहतवाद्याला जिवंत पकडलं

नवी दिल्ली : सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवादी बनलेल्या एका तरूणाच्या आईला दिलेलं आश्वासन निभावण्यासाठी त्याला जिवंत पकडले. सोहेल नावाचा तरुण चार महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी झाला. जेव्हा लष्कराचे अधिकारी त्याच्या घरी चौकशी करायला गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्या आईला आश्वासन दिले की ते सोहेलचे एनकाऊंटर करणार नाहीत. लष्कराने आपले आश्वासन पूर्ण केले. सोहेलने त्यांच्यावर गोळीबार केला तरीही जवानांनी […]

आईचा शब्द पाळला, दशहतवाद्याला जिवंत पकडलं
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

नवी दिल्ली : सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवादी बनलेल्या एका तरूणाच्या आईला दिलेलं आश्वासन निभावण्यासाठी त्याला जिवंत पकडले. सोहेल नावाचा तरुण चार महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मदमध्ये सहभागी झाला. जेव्हा लष्कराचे अधिकारी त्याच्या घरी चौकशी करायला गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याच्या आईला आश्वासन दिले की ते सोहेलचे एनकाऊंटर करणार नाहीत. लष्कराने आपले आश्वासन पूर्ण केले. सोहेलने त्यांच्यावर गोळीबार केला तरीही जवानांनी त्याच्यावर गोळ्या चालवल्या नाहीत, शिवाय त्याला जिवंत पकडलं.

लेफ्टनंट कर्नल एस राघव यांनी सांगितले की,

“काश्मीरच्या कुरू येथील रहिवासी सोहाल निसार लोन ‘सी’ कॅटेगरीचा दहशतवादी आहे. ज्याला जिवंत पकडण्यात आले आहे. तो चार महिन्यांआधी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. जेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो, तेव्हा त्याच्या आई आणि बहिणिने त्याने घरी परतावे अशी विनंती केली. आम्ही त्याच्या आईला आश्वासन दिले की, जर तो आमच्या समोर आला तर आम्ही त्याचे एनकाऊंटर करणार नाही.”

लेफ्टनंट कर्नलने सांगितले की, मागील एक महिन्यापासून येथील दहशतवाद्यांच्या हालचालींवर आम्ही नजर ठेवून होते. बिजनारी परीसराला वेढा घातला होता. यादरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या अनेक ग्राऊंड वर्करला अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून पाक दहशतवादी आणि सोहेलच्या ठिकाणाची माहिती मिळाली. जिथे जाऊन लष्कराच्या जवानांनी सोहेल आणि इतर तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले.

या दहशतवाद्यांजवळून एके-47, दोन ग्रेनेड, एक पिस्टल आणि दोन मॅग्झीन लष्कराने हस्तगत केल्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...