AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये दूध चोरांचा सुळसुळाट, लॉकडाऊनमध्ये दूध पुरवणाऱ्या वितरकांची लूटमार

लॉकडाऊनदरम्यान कल्याण पूर्वेत दूध चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे (Kalyan Milk Distributors). या चोरट्यांमुळे दूध वितरक हवालदिल झाले आहेत.

कल्याणमध्ये दूध चोरांचा सुळसुळाट, लॉकडाऊनमध्ये दूध पुरवणाऱ्या वितरकांची लूटमार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 18, 2020 | 3:45 PM
Share

ठाणे : लॉकडाऊनदरम्यान कल्याण पूर्वेत दूध चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे (Kalyan Milk Distributors). या चोरट्यांमुळे दूध वितरक हवालदिल झाले आहेत. चोरट्यांचे चोरी करण्याचे प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. चोरटे कल्याण पूर्वेतील विविध भागांमध्ये चोरी करत आहेत. याप्रकरणी कल्याण पूर्व दूध वितरक संघटनेने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे (Kalyan Milk Distributors).

कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत 65 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचं मोठं संकट समोर असतानाही अत्यावश्यक सेवा पुरवणारे दूध वितरक स्वत: च्या जीवाची पर्वा न करता दूध वितरण करत आहेत. मात्र, ते कोरोनापेक्षा दुधाच्या चोरीनेच जास्त त्रस्त झाले आहेत. कधी चोरटे रिक्षामधून दूध घेऊन जातात तर कधी बाईकवर ट्रिपलसीट येऊन दूधाचे कॅरेट लंपास करतात. या चोरट्यांमुळे दूध वितरकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

“लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणून दूध, भाजीपाला, मेडीकल सुरु आहेत. आम्ही जीवाशी खेळून आमचं काम चांगल्याप्रकारे करत आहोत. मात्र, दूध चोरांनी प्रचंड त्रास दिला आहे. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ यामुळे आम्ही प्रचंड हैराण झालो आहोत. दुधाची चोरी एरव्ही नेहमी अधूनमधून होत असते. मात्र, सध्या लॉकडाऊननंतर दूध चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे”, अशी माहिती कल्याण पूर्वेतील दूध वितरक सुरेश पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

“कल्याण पूर्वेत एकूण 52 दूध वितरक आणि उपवितरक आहेत. या सर्वांना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. आम्ही दररोज पाळत ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते दररोज वेगवेगळ्या विभागात दूध चोरी करतात. याशिवाय ते रिक्षातून तीन ते चार जण किंवा बाईकवर दोन ते तीन जण हत्यारे घेऊन येतात. त्यामुळे एकटा माणूस या चोरट्यांचा सामना करणं अशक्य आहे”, असं सुरेश पाटील म्हणाले.

“याप्रकरणी आम्ही कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. संचारबंदीमुळे सध्या पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्हीच आमच्या दुधाचं संरक्षण करायचं ठरवलं होतं. मात्र, परिस्थिती आता गंभीर होत असल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला पोलिसांना याबात माहिती द्यावी लागली. पोलिसांना सांगितल्यानंतर तीन पोलीस कॉन्स्टेबल येऊन गेले आणि त्यांनी ज्या भागात दूध चोरी झाली आहे त्या भागांची पाहणी केली”, असं दूध वितरक सुरेश पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

4 दिवसांचं बाळ, दोन नर्स, दोन वॉर्ड बॉय, एका आयाला कोरोना, वसई-विरारमध्ये 13 नवे रुग्ण

SARI : औरंगाबादेत कोरोनासह सारीचं थैमान, 13 जणांचा मृत्यू, सारीच्या रुग्णांची संख्या 100 वर

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...