AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल शर्माही विवाहबंधनात अडकला

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचं वारं वाहत आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक यांच्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेकांनी लग्न केले. त्यातच 12 डिसेंबर या दिवशी सर्वात जास्त लग्न झाले. मुकेश अंबानी यांच्या मुलीचे लग्नही याच दिवशी झाले. तर प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माही बुधवारी 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत विवाहबंधनात अडकला. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी […]

कपिल शर्माही विवाहबंधनात अडकला
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचं वारं वाहत आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक यांच्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेकांनी लग्न केले. त्यातच 12 डिसेंबर या दिवशी सर्वात जास्त लग्न झाले. मुकेश अंबानी यांच्या मुलीचे लग्नही याच दिवशी झाले. तर प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माही बुधवारी 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत विवाहबंधनात अडकला. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी पद्धतीने पार पडला. कपिलच्या लग्नाची त्याच्या चाहत्यांना खूप काळापासून प्रतिक्षा होती. त्याच्या लग्नाचा सोहळा 10 डिसेंबर पासूनच सुरु झाला होता. यामध्ये मेहंदी आणि संगीत सोहळे झाले.

कपिलच्या लग्नाला टीव्ही जगातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली, यात कपिलच्या जवळच्या मित्रमंडळींचा समावेश होता. कपिलच्या लग्नाला अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, कॉमेडीयन कृष्‍णा अभिषेक, कॉमेडीयन सुदेश लहरी, कॉमेडीयन भारती सिंह यांची विशेष उपस्थिती होती. लग्नापूर्वी झालेल्या विधींनाही हे सर्व उपस्थित होते.

लग्नावेळी कपिल शर्मा हा हिरव्या रंगाच्या शेरवानीत दिसला, त्यासोबतच त्याने सुंदर अशी पगडी घातली होती, तसेच त्याच्या हातात तलवार होती. तर गिन्नीने लाल रंगाचा लेहंगा घातला होता. तिचे दागिने हे जरा हटके होते.

स्टेजवर पोहोचताच कपिल आणि गिन्नीने माध्यमांना पोज दिले, यावेळी दोघेही खूप खूश दिसून आले.

लग्नानंतर कपिल दोन रिसेप्शन देणार आहे. पहिलं रिसेप्शन हे 14 डिसेंबरला अमृतसर येथे असेल तर दुसरं रिसेप्शन 24 डिसेंबरला मुंबईत ठेवण्यात आले आहे.

कपिल शर्मा लवकरच त्याच्या सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’मधून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये री-एंट्री घेणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याबाबत माहिती दिली होती.

पहा कपिल शर्माच्या लग्नाचे काही खास फोटो…

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला