AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्तिकच्या नव्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेही कार्तिकसोबत दिसणार आहे. 1978 साली बी. आर. चोप्रा यांच्या ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा आला होता. कार्तिक आर्यनचा हा नवा सिनेमा बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमाचा […]

कार्तिकच्या नव्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेही कार्तिकसोबत दिसणार आहे. 1978 साली बी. आर. चोप्रा यांच्या ‘पती पत्नी और वो’ हा सिनेमा आला होता. कार्तिक आर्यनचा हा नवा सिनेमा बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमाचा रिमेक आहे. कार्तिक आर्यनने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेही दिसणार आहे. अनन्या याचवर्षी ‘स्टुडंट ऑफ द इअर’च्या सिक्वेलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘पती पत्नी और वो’ हा तिचा दुसरा सिनेमा असेल. बी. आर. चोप्रा यांच्या सिनेमात अभिनेता संजीव कपूर, अभिनेत्री विद्या सिन्हा आणि रंजीता कौर हे मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात विवाहबाह्य संबंधांना विनोदीप्रकारे दाखवण्यात आलं होतं.

‘पती पत्नी और वो’ या सिनेमाचं दिग्दर्शन मुदस्सर अजीजने केलं आहे. 6 डिसेंबरला अभिनेता अर्जुन कपूरचा ‘पानीपत’ हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘पती पत्नी और वो’ आणि ‘पानीपत’ हे बॉक्सऑफिसवर आमनेसामने असतील.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...