AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, 4 जण ताब्यात

कुरुंदवाड पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतलेअसून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, 4 जण ताब्यात
| Updated on: Oct 07, 2020 | 11:39 PM
Share

इचलकरंजी: शहराजवळ असणाऱ्या खिद्रापूर, अकिवाट, टाकळीवाडी या भागातील बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले आहे. कुरुंदवाड पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.  बनावट नोटा छापण्याची छपाई मशीन, लॅमिनेशन मशीन, इलेक्ट्रीक पॅनेल, कागदाचे गट्टे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगेंनी दिली. (Kurundwad police arrested four accused in fake currency note racket)

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह पोलीस नाईक प्रकाश हंकारे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते असिफ शिराजभाई यांच्या पथकाने खिद्रापूर, अकिवाट, टाकळीवाडी भागात छापा टाकून बनावट नोटा बनवणारे रॅकेट उघडकीस आणले. बनावट नोटा रॅकेटचे धागेदोरे कर्नाटकात आहेत, असेही घाडगे म्हणाले.

दरम्यान,  पोलिसांनी 2 हजार रुपयांच्या 51 तर 100 रुपयांच्या 99 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. चार वर्षांपूर्वी याच भागातील दत्तवाड परिसरात सांगली पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर पुन्हा बनावट नोटा प्रकरण समोर आल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक परिसरात खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या :

Pune Crime | पुणे बनावट नोटांप्रकरणी 6 आरोपींना 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

(Kurundwad police arrested four accused in fake currency note racket)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.