AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःच्याच घरात चोरी, भाडेकरुच्या दागिन्यांवर डल्ला, घरमालक अटकेत!

वर्ध्यात भाडेकरुच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या घरमालकाला अटक करण्यात आली आहे. भाडेकरु बाहेर गेल्याची संधी साधून घरमालकाने महिलेचं मंगळसूत्र लंपास केलं होतं.

स्वतःच्याच घरात चोरी, भाडेकरुच्या दागिन्यांवर डल्ला, घरमालक अटकेत!
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 13, 2019 | 8:49 AM
Share

वर्धा : स्वतःच्याच घरात चोरी करणारा चोर तुम्ही कधी पाहिला आहे का? वर्ध्यात आपल्याच घरात राहणाऱ्या भाडेकरुच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या घरमालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. घरमालक राकेश नाल्लावार याने प्रियंका जिवतोडेच्या मंगळसूत्रासह काही दागिने चोरले होते.

हिंगणघाट शहरातील न्यू यशवंतनगर भागात भाड्याने राहणाऱ्या महिलेच्या घरात चोरी झाली. शहरात सततच्या घरफोडीच्या घटना पाहता सुरुवातीला चोरांच्या टोळीवर संशय होता. मात्र सखोल चौकशी केली असता हा घरमालकाचा प्रताप असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. दारुच्या व्यसनातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात हिंगणघाट शहरात तीन दिवसात पाच घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. हिंगणघाट पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करुन पाचही चोऱ्या उघडकीस आणल्या. यातील चार चोरांना नागपूरमध्ये जेरबंद करण्यात आलं. याच दरम्यान यशवंतनगर मधील घरातील चोरीची कबुली न मिळाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिशेने तपास सुरु केला.

मूळ वडनेरमधील असलेल्या प्रियंका जिवतोडे या हिंगणघाटमध्ये राकेश नल्लावार यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. तीन ऑगस्ट रोजी प्रियंका आपल्या घरी कुलूप लावून वडनेरला गेल्या होत्या. वडनेरहून परत आल्यावर सात तारखेला ही चोरीची घटना उघड झाली.

प्रियंका यांचे चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या तोड्या असे 16 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आलं. यात संशयावरुन चार दिवसांपासून बाहेर गेलेल्या घरमालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं.

घरमालकाच्या वर्तनावरुन पोलिसांचा संशय बळावला. कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने त्याने यवतमाळ जिल्ह्यातील वणी मधील सोनार विनोद खेरा यांना विकल्याची कबुली दिली. यानुसार चोरीतील 16 हजारांचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला. चोरीचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश