सैन्य भरतीदरम्यान महागोंधळ, पोलिसांचा तरुणांवर लाठीमार

सैन्य भरतीदरम्यान महागोंधळ, पोलिसांचा तरुणांवर लाठीमार

नाशिक : देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये सैन्यभरतीदरम्यान मोठा गदारोळ झाला आहे. सैन्यातील 68 जागांसाठी 10 ते 12 हजार जण दवेळाली आर्टिलरी सेंटरमध्ये दाखल झाले आणि एकच अनागोंदी निर्माण झाली. पर्यायाने सैन्य भरतीदरम्यान पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे तरुणांनी जिकडे रस्ता मिळेल, तिकडे पळापळ केली. त्यामुळे गोंधळ आणखीच वाढला. धक्कादायक म्हणजे, लाठीमारापासून आपला जीव वाचवण्यासाठी काही तरुणांनी गटारांमध्ये उड्या टाकल्या.

काल म्हणजे 17 डिसेंबरपासून नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये सैन्य भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या सैन्य भरतीसाठी राज्यभरातून प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची कोणतीही व्यवस्था नसल्याने कडाक्याच्या थंडीत या तरुणांना गुराढोरासारखं राहावं लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक तरुणांना या ठिकाणी मारहाण देखील झाल्याने या भरती प्रक्रियेच्या व्यवस्थेबाबत संताप व्यक्त होतो आहे.

पाहा व्हिडीओ :

नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटरमध्ये सैन्य भरती असल्याची जाहिरात काही दिवसांपूर्वी आली आणि हजारोंच्या संख्येने बेरोजगार तरुण या भरतीसाठी नाशिकमध्ये आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मुलांची कोणतीही व्यवस्था नसल्याने नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत अनेकांना रस्त्याच्या फुटपाथवरच रात्र जागून काढावी लागली. काहींनी शेकोटीचा आसरा घेतला तर अनेकांकडे साधा स्वेटर देखील नसल्याने नाशिकच्या थंडीत ते गारठून गेले.

इथल्या गोंधळात आणि गर्दीत अनेकांच्या चपला बूट देखील हरवले. त्यामुळे अनेकांना अनवाणीच परतीचा प्रवास करावा लागला.

सैन्याय भरती होण्याचं स्वप्न उराशी घेऊन राज्यभरातून आलेल्या या तरुणांना निराश होऊन परतावं लागलं. तीन दिवस नाशिकमध्ये ही भरती प्रक्रिया चालणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या भरती प्रक्रियेचे तीनेतेरा वाजल्याचं बघायला मिळालं.

Published On - 11:24 am, Tue, 18 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI