AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातावर सपासप वार, मनगट न तुटल्याने पुन्हा वार, लातूरमध्ये तुटलेलं मनगट घेऊन आरोपी पसार

लातूर जिल्ह्यात हिंस्रपणाची खळबळजनक घटना घडली आहे. जळकोट तालुक्यात एका आरोपीने तरुणाचा हात मनगटापासून तोडून, तो आपल्यासोबत घेऊन पळून गेला. चेरा या गावात ही थरारक घटना घडली.

हातावर सपासप वार, मनगट न तुटल्याने पुन्हा वार, लातूरमध्ये तुटलेलं मनगट घेऊन आरोपी पसार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 20, 2019 | 12:48 PM
Share

लातूर : लातूर जिल्ह्यात हिंस्रपणाची खळबळजनक घटना घडली आहे. जळकोट तालुक्यात एका आरोपीने तरुणाचा हात मनगटापासून तोडून, तो आपल्यासोबत घेऊन पळून गेला. चेरा या गावात ही थरारक घटना घडली. चार दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेची परिसरात एकच चर्चा सुरु आहे. जखमी व्यक्तीचा हात आणि आरोपी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. (Latur jalkot crime)

प्रकाश माने असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर पिराजी पिकले या आरोपीने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. चेरा पाटी गावाजवळच्या धाब्यावर जेवण करुन प्रकाश माने घराकडे जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या पिराजी पिकलेने तीक्ष्ण हत्याराने प्रकाश मानेवर हल्ला केला. पिराजीने प्रकाशच्या हातावर सपासप वार केले. त्याने हात मनगटापासून कापून काढला.

हात  सहजा सहजी तुटत नसल्याने आरोपीने प्रकाशच्या हातावर सपा-सप  वार  केले. त्यानंतर मनगटापासून तुटलेला हात घेऊन आरोपी पिराजी गाव सोडून पळून गेला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावरील उपचारानंतर पोलिसांनी त्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेला चार दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप ना आरोपी सापडला, ना मनगटापासून तुटलेला हात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...