मध्य प्रदेशात ‘कडकनाथ’सोबत दुधाचीही विक्री, रोजगारासाठी सरकारचा फंडा

या योजनेमुळे (Kadaknath chicken and milk parlor) लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. गायीचं दूधही चिकनसोबतच विकलं जात असल्यामुळे आम्ही आक्षेप घेत आहोत, असं भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा म्हणाले.

मध्य प्रदेशात 'कडकनाथ'सोबत दुधाचीही विक्री, रोजगारासाठी सरकारचा फंडा
Follow us
| Updated on: Sep 14, 2019 | 5:40 PM

भोपाळ : एकाच दुकानात चिकन आणि दूध (Kadaknath chicken and milk parlor) विकण्याच्या मध्य प्रदेश सरकारच्या योजनेवर विरोधी पक्ष भाजपने जोरदार टीका केली आहे. या योजनेमुळे (Kadaknath chicken and milk parlor) लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. गायीचं दूधही चिकनसोबतच विकलं जात असल्यामुळे आम्ही आक्षेप घेत आहोत, असं भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा म्हणाले.

दूध पार्लर आणि चिकन पार्लर दोन वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना द्यावेत. दोन्हीही दुकाने एका ठराविक अंतरावर असावेत, अशीही मागणी रामेश्वर शर्मा यांनी केली. काँग्रेस सरकारने आदिवासी महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून दूध आणि चिकन पार्लर भोपाळमधील वैशाली नगरमध्ये सुरु करण्यात आलंय.

काय आहे दूध आणि चिकन पार्लर?

मध्य प्रदेश सरकारच्या कुक्कुटपालन विभागाने तरुणांना रोजगार देण्यासाठी कडकनाथ कोंबडीचं चिकन विक्रीला प्रोत्साहन दिलंय. यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून कडकनाथ कोंबडीचं चिकन आणि अंडी एकाच ठिकाणी विकली जात आहेत. त्यातच दूध पार्लरही सुरु करण्यात आलंय.

मध्य प्रदेशात कडकनाथ कोंबडीला प्रचंड मागणी आहे. कडकनाथ कोंबडीचं मांस खाल्ल्याने लैंगिक क्षमता वाढते असा लोकांमध्ये समज आहे. हे मांस उत्तेजित करणाऱ्या औषधांपेक्षा जास्त प्रभावी असल्याने याला देशी वायग्राही म्हटलं जातं.

कडकनाथ कोंबड्याची किंमत 900 ते 1200 रुपये प्रति किलो आहे. तर कोंबडीची किंमत 3 ते 4 हजार रुपयांदरम्यान आहे. अंड्याची किंमतही 50 रुपयांच्या आसपास आहे. कडकनाथच्या किंमतीमध्ये नेहमीच बदल पाहायला मिळतो. मध्य प्रदेशात उन्हाळ्यात 800 ते 100, थंडीत 1000 ते 1200 असा दर असतो.

काही महिन्यांपूर्वीच कडकनाथच्या जीआय टॅगवरुन छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात वादही निर्माण झाला होता. अखेर मध्य प्रदेशातील झाबुआला जीआय मानांकन देण्यात आलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.