Maharashtra Corona Update | पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक 36 हजार 810 सक्रिय रुग्ण आहेत (Maximum Corona active Patients in Pune).

Maharashtra Corona Update | पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 9:51 PM

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही दररोज मोठ्या प्रमाणात नव्या रुग्णांची भर पडत आहे (Maximum Corona active Patients in Pune). पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक 36 हजार 810 सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत 23 हजार 704 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात आढळले. मात्र, मुंबईतील परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे.

राज्यात पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात सध्या 36 हजार 219 सक्रिय रुग्ण आहेत. तर सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांक लागतो. दरम्यान, राज्यात सध्या एकूण 1 लाख 32 हजार 236 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत (Maximum Corona active Patients in Pune).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यात दिवसभरात 8 हजार 369 नवे रुग्ण

राज्यात आज (21 जुलै) दिवसभरात 8 हजार 369 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 लाख 27 हजार 31 वर पोहचला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत 12 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 7 हजार 188 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दिवसभरात 7 हजार 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 82 हजार 217 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 32 हजार 236 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.72 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात 246 रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात 246 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये फक्त मुंबईतील 62 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.75 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 12 हजार 276 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 16 लाख 40 हजार 644 नमुन्यांपैकी 3 लाख 27 हजार 31 नमुने पॉझिटिव्ह (19.93 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 79 हजार 676 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 77 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या 13 दिवसात किती रुग्ण वाढले?

  • 8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण
  • 9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण
  • 10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण
  • 11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण
  • 12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण
  • 13 जुलै 2020 – 6 हजार 497 रुग्ण
  • 14 जुलै 2020 – 6 हजार 741 रुग्ण
  • 15 जुलै 2020 – 7 हजार 975 रुग्ण
  • 16 जुलै 2020 – 8 हजार 614 रुग्ण
  • 17 जुलै 2020 – 8 हजार 308 रुग्ण
  • 18 जुलै 2020 – 8 हजार 348 रुग्ण
  • 19 जुलै 2020 – 9 हजार 518 रुग्ण
  • 20 जुलै 2020 – 8 हजार 240 रुग्ण
  • 21 जुलै 2020 – 8 हजार 369 नवे रुग्ण

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.