AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Update | दिवसभरात 10,576 नवे कोरोना रुग्ण, गेल्या 15 दिवसातील सर्वात मोठा आकडा

राज्यात आज (22 जुलै) दिवसभरात सर्वाधिक 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा गेल्या 15 दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा आहे.

Maharashtra Corona Update | दिवसभरात 10,576 नवे कोरोना रुग्ण, गेल्या 15 दिवसातील सर्वात मोठा आकडा
| Updated on: Jul 22, 2020 | 10:01 PM
Share

मुंबई : राज्यात लॉकडाऊन केला, अनेक निर्बंध लादले तरीही (Maharashtra COVID-19 Latest Update) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात आज (22 जुलै) दिवसभरात सर्वाधिक 10 हजार 576 नवे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा गेल्या 15 दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 लाख 37 हजार 607 वर पोहोचला आहे. याशिवाय, राज्यात आतापर्यंत 12 हजार 556 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Maharashtra COVID-19 Latest Update).

दिवसभरात 5 हजार 552 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दिवसभरात 5 हजार 552 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 87 हजार 769 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 36 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 55.62 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिवसभरात 280 रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात 280 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये फक्त मुंबईतील 58 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.72 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 12 हजार 556 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात 8 लाख 58 हजार 121 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 16 लाख 87 हजार 213 नमुन्यांपैकी 3 लाख 37 हजार 607 नमुने पॉझिटिव्ह (20 टक्के) आले आहेत. राज्यात 8 लाख 58 हजार 121 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 975 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत (Maharashtra COVID-19 Latest Update).

राज्यात गेल्या 15 दिवसात किती रुग्ण वाढले?

  • 7 जुलै 2020 – 5 हजार 134 नवे रुग्ण
  • 8 जुलै 2020 – 6 हजार 603 नवे रुग्ण
  • 9 जुलै 2020 – 6 हजार 875 नवे रुग्ण
  • 10 जुलै 2020 – 7 हजार 862 नवे रुग्ण
  • 11 जुलै 2020 – 8 हजार 139 नवे रुग्ण
  • 12 जुलै 2020 – 7 हजार 827 नवे रुग्ण
  • 13 जुलै 2020 – 6 हजार 497 नवे रुग्ण
  • 14 जुलै 2020 – 6 हजार 741 नवे रुग्ण
  • 15 जुलै 2020 – 7 हजार 975 नवे रुग्ण
  • 16 जुलै 2020 – 8 हजार 614 नवे रुग्ण
  • 17 जुलै 2020 – 8 हजार 308 नवे रुग्ण
  • 18 जुलै 2020 – 8 हजार 348 नवे रुग्ण
  • 19 जुलै 2020 – 9 हजार 518 नवे रुग्ण
  • 20 जुलै 2020 – 8 हजार 240 नवे रुग्ण
  • 21 जुलै 2020 – 8 हजार 369 नवे रुग्ण
  • 22 जुलै 2020 – 10 हजार 576 नवे रुग्ण

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra COVID-19 Latest Update

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्याची कोरोना आकडेवारी चुकीची, यंत्रणांच्या समन्वयाअभावी आकड्यात घोळ

Corona Vaccine | ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात, सिरम इन्स्टिट्यूटचा दावा

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.