AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांना अटक

लिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून दिल्लीतील आणखी काही भागांमध्ये छापे टाकले जाण्याची शक्यता आहे. | Delhi terror attack attempt

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 'जैश'च्या दोन दहशतवाद्यांना अटक
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 17, 2020 | 10:33 AM
Share

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दहशतवादी हल्ल्याचा (terror attack ) कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांकडून सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. (Major terror attack foiled 2 Jaish-e-Mohammad terrorists arrested in Delhi)

प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी काल रात्री छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली. हे दोन्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रहिवाशी असल्याचे समजते. अब्दुल लतीफ मीर आणि मोहम्मद अश्रफ अशी त्यांची नावे असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना पकडण्यासाठी सराय काले खा येथील मिलेनियम पार्क परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास हे दोघे तिकडे आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या घटनेनंतर दिल्लीतील पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून दिल्लीतील आणखी काही भागांमध्ये छापे टाकले जाण्याची शक्यता आहे.

नेपाळमार्गे पाकिस्तानला पळून जायचा होता प्लॅन या दोघांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्करामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला होता. त्यामुळे या दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे पाकिस्तानात जाण्याची योजना आखली होती. दिल्लीत बॉम्बस्फोट करून नेपाळमध्ये जायचे, असे त्यांनी ठरवले होते.  यापूर्वी ऑगस्ट महिन्यात दिल्ली पोलिसांनी एका दहशतवाद्याला पकडले होते. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 15 किलो स्फोटके हस्तगत केली होती.

संबंधित बातम्या:

आजोबाच्या मृतदेहावर नातू, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य

पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद, कोल्हापूरचे ऋषीकेश जोंधळे यांना 20व्या वर्षी वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या 3 नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

बदला घेतला! भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी चौक्या, पाहा तुफानी हल्ल्याचा VIDEO

(Major terror attack foiled 2 Jaish-e-Mohammad terrorists arrested in Delhi)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...