आता दुसरी लाईन पकडायची नाही, एसईबीसी आरक्षणच टिकवायचं; संभाजीराजेंचा निर्धार

| Updated on: Oct 26, 2020 | 7:01 PM

राज्य सरकारने काय जोर लावायचाय तो आत्ताच लावावा, पण मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. | MP Sambhaji Raje

आता दुसरी लाईन पकडायची नाही, एसईबीसी आरक्षणच टिकवायचं; संभाजीराजेंचा निर्धार
Follow us on

जालना: मराठा समाज सामाजिकरित्या मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता आपण एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आता दुसरी लाईन पकडायची नाही. आता फक्त एसईबीसी आरक्षण टिकवायचे, असा निर्धार भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला.  (BJP MP Sambhaji Raje on Maratha reservation)

मराठा आरक्षणाच्या खटल्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे जालन्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. राज्य सरकारने काय जोर लावायचाय तो आत्ताच लावावा, पण मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. एसईबीसी आरक्षण टिकावे, हीच सकल मराठा समाजाची भूमिका असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

तसेच मराठा समाजाप्रमाणे ओबीसी, एसटी आणि एससी हा समाजदेखील माझाच आहे. मला त्यांच्यासाठीही बोलायचे आहे. पण सध्या मराठा आरक्षण हा माझ्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. हे आरक्षण मिळेपर्यंत मी मराठा समाजासोबत राहणार. भविष्यात मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, अशी इच्छा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

यापूर्वी 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राज्यातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याती आली होती. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठवण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षणावरून तुळजापूर येथे आंदोलनही करण्यात आले होते. या सगळ्यात छत्रपती संभाजीराजे केंद्रस्थानी होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कोल्हापूर मेळाव्यात करण्यात आली होती. इतकंच नाही, तर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर, ‘मराठ्यांची ताकद दिल्लीत दाखवू’ असा इशाराही सकल मराठा समाजाकडून देण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून सावळा गोंधळ : विनायक मेटे

संभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे

Maratha Reservation ! मला चर्चेला बोलवा, एका महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल; हरिभाऊ राठोड यांचा दावा

(BJP MP Sambhaji Raje on Maratha reservation)