AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी काही नेत्यांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा जोरदार टोला लगावला आहे. तसंच येत्या ३ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणाही करण्यात आली आहे.

संभाजीराजेंनी OBC कोट्यातून मराठा आरक्षणाचा अभ्यास करु नये, नापास होतील : प्रकाश शेंडगे
| Updated on: Oct 20, 2020 | 2:30 PM
Share

मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येईल का, याचा अभ्यास खासदार संभाजीराजे यांनी करु नये, ते नापास होतील, असा खोचक टोला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी लगावला आहे.  मराठ्यांचं ओबीसीकरण करु नये या मागणीसाठी ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीकडून 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. तर 10 नोव्हेंबरला मुंबईत ओबीसी नेत्यांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. इतकच नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाला घेराव घालण्याचा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे. (OBC leader Prakash Shendge on Sambhajiraje chatrapati and protest )

राज्य सरकारनं ‘सारथी’ संस्थेला स्वायत्त दर्जा दिला. त्याप्रमाणेत ‘महाज्योती’ या संस्थेलाही स्वायत्तता द्या, अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल ही हरीभाऊ राठोड यांची वैयक्तिक भूमिका आहे. या भूमिकेशी ओबीसी समाज सहमत नसल्याचं शेंडगे यांनी सांगितलं. तसंच राठोड यांच्या भूमिकेवरही त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

धनगर आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग

दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज औरंगाबादेत पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी धनगर समाज औरंगाबाद ते जालना अशी भव्य मानवी साखळी उभारुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या औरंगाबादेतील निवासस्थानापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील निवासस्थानापर्यंत ही मानवी साखळी असणार आहे. त्यासाठी राज्यभरातून धनगर समाजातील हजारो लोक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे लहुजी शेवाळी यांनी दिली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजही आक्रमक झाला आहे. तर धनगर समाजाकडूनही सातत्यानं आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी केल्या सहा दशकांपासून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

धनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार, धनगर नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनाची हाक

OBC leader Prakash Shendge on Sambhajiraje chatrapati and protest

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.