LIVE: 'धनगर आरक्षणचा 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन' : पडळकर

दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा एका क्लिकवर वेगवान आढावा...

LIVE: 'धनगर आरक्षणचा 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन' : पडळकर
Picture

'धनगर आरक्षणचा 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन'

पुढील 15 दिवसात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा इशारा, मराठा आरक्षणासंदर्भात जशी रोज सुनावणी घेतली, तशी धनगर आरक्षणाबाबतीतही रोज सुनावणी घ्यावी, पडळकर यांची मागणी.

19/06/2019,3:48PM
Picture

शिवसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग

#मुंबई – शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे, शिवसैनिकांकडून षण्मुखानंद सभागृहाबाहेर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे होर्डिंग. षण्मुखानंद सभागृहाबाहेर शिवसैनिकांनी लावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची होर्डिग्स. आज शिवसेनेचा 53 वा वर्धापन दिन. षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी सोहळा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. फडणवीस यांची उपस्थिती सोहळ्याचं प्रमुख आकर्षण.

19/06/2019,12:44PM
Picture

मध्य रेल्वे वाहतूक उशिराने, ऐन गर्दीच्यावेळी वाहतूक खोळंबा

मध्य रेल्वे वाहतूक उशिराने, आजही ऐन गर्दीच्या वेळात अप आणि डाउन लाइनवर वाहतूक खोळंबा, रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनटं उशिराने, दुरोंतो एक्स्प्रेसचे इंजिन नेरुलजवळ फेल, कर्जत मार्गावरही परिणाम

19/06/2019,9:05AM
Picture

बिहारमध्ये मृत्यूचे तांडव सुरुच, मृतांची संख्या 130 वर, तर 300 मुलं गंभीर आजारी, मृतांमध्ये मुलींची संख्या सर्वाधिक, नितीश कुमारांच्या विरोधात संतापाचे वातावरण

19/06/2019,8:16AM
Picture

कोकण, गोव्यात आज सर्वत्र पावसाची शक्यता

कोकण, गोव्यात आज सर्वत्र पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पुढील 2 दिवस तुरळक पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

19/06/2019,7:54AM
Picture

54 व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल

भाजपशी युती मात्र शिवसेना स्वतंत्र पाण्याची संघटना, 54 व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, वर्धापन दिनाचे औचित्य साधत सामनातून शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा निर्धार

19/06/2019,7:49AM
Picture

वसईत बंगल्याला आग, 2 तासानंतर आगीवर नियंत्रण

वसईत बंगल्याला आग, 2 तासानंतर आगीवर नियंत्रण, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, घरातील लाखो रुपयांची आर्थिक हानी, कोणतीही जीवित हानी नाही

19/06/2019,7:43AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *