Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून सावळा गोंधळ : विनायक मेटे

आम्ही मराठा आरक्षण प्रकरणी लक्ष द्या, असे राज्य सरकारला म्हटलं होतं पण सरकारकडून सावळा गोंधळ झाला, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. (Vinayak Mete criticize state govt on Maratha Reservation)

Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून सावळा गोंधळ : विनायक मेटे

मुंबई : मराठा समाजाला लोकशाही मार्गाने आरक्षण मिळालं होते. सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली. राज्य सरकारला आम्ही याप्रकरणी लक्ष द्या, असं म्हटलं होतं पण सरकारकडून सावळा गोंधळ झाला, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. (Vinayak Mete criticize state govt on Maratha Reservation)

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण लक्ष देत नाहीत हे पूर्वी सांगितले होते. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे हे सर्व घडलं आहे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्षात घ्यावे, अशी विनंती मेटेंनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे सर्व भरती, सर्व प्रवेश थांबले आहेत. स्थगिती उठवण्यासाठी विनंती अर्ज करा असं आम्ही म्हणत आहोत. ही परिस्थिती निर्माण झाली, याला सरकार जबाबदार आहे. सरकारने सुरुवातीपासून काही केले नाही. आता 22 तारखेला अर्ज केल्याचे मेटेंनी म्हटले.

मराठा आरक्षणाला ज्या खंडपीठाने स्थगिती दिली त्यांच्याकडेच स्थगिती उठवण्यासाठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय समोर येईल हे सर्वांना माहीत आहे, असे विनायक मेटेंनी म्हटले. मराठा आरक्षणावरील सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. सरकारने अजूनही आरक्षणप्रश्नी घटनापीठ स्थापन करण्यासाठी अर्ज केला नाही , हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छित नसल्याची टीका मेटेंनी केली.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून ताबडतोब 50 हजार रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी विनायक मेटेंनी केली. ऊसतोड कामगारांसाठी शिवसंग्राममार्फत संप पुकारला आहे. मात्र, हा संप दडपण्याचं काम साखर कारखाने करत आहेत, अशी टीकादेखील विनायक मेटेंनी केली.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना मदत करुन , बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सिद्ध करावा, विनायक मेटेंचा मुखमंत्र्यांवर घणाघात

बाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

(Vinayak Mete criticize state govt on Maratha Reservation)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *