AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mayor Sandeep Joshi Exclusive | तुकाराम मुंढेंनी मला शहाणपण शिकवू नये, महापौरांचं आयुक्तांना उत्तर

नागपूरमध्ये महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे (Nagpur Mayor Sandip Joshi on Tukaram Mundhe).

Mayor Sandeep Joshi Exclusive | तुकाराम मुंढेंनी मला शहाणपण शिकवू नये, महापौरांचं आयुक्तांना उत्तर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 22, 2020 | 12:00 PM
Share

नागपूर : एकिकडे कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये महापौर आणि आयुक्त वाद टोकाला गेला आहे (Nagpur Mayor Sandip Joshi on Tukaram Mundhe). व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचा आरोप करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला. तसेच महापौरांवर दुटप्पीपणाचा आरोप केला. यानंतर आता नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. त्यांनी मला शहाणपण शिकवू नये, अशा शब्दात महापौर जोशी यांनी मुंढे यांच्यावर टीका केली.

संदीप जोशी म्हणाले, “मनपा आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचा फोन उचलत नाही. महापौरांच्या मेसेजला रिप्लाय देत नाही. मुंढे नगरसेवकांना भेटत नाहीत. चार चार महिने नगरसेवकांच्या फाईल दडवून ठेवतात. महापौरांचा अपमान करतात. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपण शिकवू नये. मी सभागृह नियमानुसार चालवलं आहे.”

“मुंढेंनी उद्या सभागृहात यावं ही हात जोडून विनंती”

सभागृहात प्रश्न विचारणे हा सदस्यांचा अधिकार आहे. महासभेत माझी भूमिका कायद्यानुसार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांना उद्या (मंगळवार, 23 जून) होणाऱ्या महासभेत यावं, अशी हात जोडून विनंती करतो, असंही महापौर संदीप जोशी यांनी नमूद केलं.

मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणाऱ्यांना काय उत्तर देऊ? : तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सभात्यागाचं कारण सांगत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणणाऱ्यांना काय उत्तर देऊ, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी महापौर आणि नगरसेवकांवर अधिकाऱ्याचं खच्चीकरण केल्याचा, अधिकाऱ्याला बोलू न दिल्याचा आणि व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचाही गंभीर आरोप केला आहे.

तुकाराम मुंढे म्हणाले, “महासभा घ्यावी की नाही यावर मी एपिडिमिक अॅक्टनुसार माझं मत महापौरांना सांगितलं होतं. शासनाकडेही मी याबाबत मार्गदर्शन मागितलं होतं. त्यांनी याबाबत अटी शर्तींचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यास सांगून सूचना केल्या. त्यानंतर ही सभा झाली. सभा झाली तेव्हा मी स्वतः हजर होतो. मात्र, सभा सुरु होताच मी कोणत्याही प्रश्नावर उत्तर द्यायला तयार असताना नगरसेवक आणि इतर पदाधिकारी मी बोलत असतानाच उभे राहून अडथळा करत होते. कोणताही प्रश्न विचारायचा आणि उत्तर देण्यास सुरुवात केली की अर्ध्यावर थांबवायचं. अधिकाऱ्यांना बोलून द्यायचं नाही. त्यानंतर अर्धवट वाक्यांचा विपर्यास करुन त्याला चुकीच्या पद्धतीने सादर करायचं. सदस्यांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काढण्याचा अधिकार आहे, मात्र, तो उत्तर पूर्ण देऊन झाल्यावर आहे. मात्र, उत्तर देत असतानाच अधिकाऱ्यावर मोठ्या आवाजात ओरडणं, अधिकाऱ्याच्या दिशेने अंगुलीनिर्देश करुन त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणं हे निंदनीय आहे.”

“हे होत असल्याने अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होतं. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. मी हे महापौरांच्या लक्षात आणून दिलं. तसेच हे परत झालं तर सभागृहात थांबणार नाही हे सांगितलं. यानंतरही हा प्रकार घडला. एका नगरसेवकाने तुम्ही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहात. इंग्रज तुमच्यापेक्षा बरे होते, असं विधान सातत्याने करत होते. असं होत असतानाही महापौरांनी संबंधित नगरसेवकांना कोणतीही सूचना दिली नाही. त्यांना थांबण्यास सांगितलं नाही. अशाप्रकारची शेरेबाजी करु नका असंही सांगितलं नाही. अशाप्रकारे व्यक्तिगत शेरेबाजी करण्याचा अधिकार ना अधिकाऱ्यांना आहे, ना पदाधिकाऱ्यांना. सभागृहाची शिस्त कायम ठेवणं महापौरांची जबाबदारी असताना त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे यानंतर सदस्यांनी तुम्ही तुकाराम महाराजांवर कलंक आहात हा शब्दप्रयोग केला. त्यावेळी मी उठलो आणि महापौरांना हे व्यक्तिगत प्रतिमाहनन असल्याचं सांगितलं. तसेच सभात्याग करत असल्याचं स्पष्ट केलं,” असंही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

“महौपारांचं दुटप्पीपणाचं धोरण चुकीचं”

तुकाराम मुंढे म्हणाले, “महापौरांनी मला पत्र पाठवत सभात्याग करणं हा सभागृहाच्या इतिहासातील कलंक असल्याचं सांगितलं. महापौरांनी मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक आहे असं म्हणणाऱ्यांना बोलण्याऐवजी मलाच कलंक असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ हे परस्पर संमतीने सुरु आहे. महापौरांचं काम समन्यायाने कुणावर अन्याय न होता सभागृह चालवणं आहे. पण त्यांनी त्याऐवजी दुजाभाव केला आणि बाहेर अर्धवट माहिती दिली. एकिकडे महापौरांनी सभागृहात अधिकार असताना चारित्र्यहनन होऊ दिलं आणि वर मलाच कलंक असल्याचं म्हटलं. हे महौपारांचं दुटप्पीपणाचं धोरण चुकीचं आहे. म्हणूनच मी सभागृहाबाहेर निघून आलो.”

“जसं महापौर ही व्यक्ती नसून संस्था आहे, तसंच आयुक्त ही देखील व्यक्ती नसून संस्था आहे. जर सभागृहात आयुक्तांनाच बोलू दिलं जात नसेल तर इतर अधिकाऱ्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार करता येईल. महापौरांनी सभागृहात चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घ्यायचा नाही आणि नंतर विनंतीच्या स्वरुपात बोलायचं याचा अर्थ समजून घेता येईल,” असंही ते म्हणाले.

“व्यवस्थात्मक प्रश्न त्याच मार्गाने साडवावे लागतील, एकटा तुकाराम मुंढे काहीही करु शकत नाही”

तुकाराम मुंढे म्हणाले, “मागील तीन महिन्यापासून आपण कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहोत. आम्ही त्या कामात व्यग्र आहोत. त्यावरच आमचं लक्ष केंद्रित आहे. असं असताना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरही कामं केलं. त्यामुळे यंत्रणा तणावत आहे. असं असताना यंत्रणांना समजून घेणं आवश्यक आहे. वर्षानुवर्षांचे प्रश्न 2-3 महिन्यात संपणार नाही. काही व्यवस्थात्मक प्रश्न असतील तर त्याला त्याच मार्गाने साडवावे लागतील. एकटा तुकाराम मुंढे काहीही करु शकत नाही. उन्हाळ्यात आम्ही पाण्याची कमतरता येऊ दिली नाही. अनेक कामं केली तरी यंत्रणांना दोष देण्यात येत आहे.”

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Tukaram Mundhe Exclusive | मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणाऱ्यांना काय उत्तर देऊ? : तुकाराम मुंढे

Tukaram Mundhe | नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर, आयुक्तांनी समजूतदारपणे घ्यायला हवं होतं, महापौरांची प्रतिक्रिया

तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीनंतर नागपुरातील विकास कामांना ब्रेक, नगरसेवक आक्रमक

.. तर तुकाराम मुंढेंविरोधातील काँग्रेसच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊ : भाजप

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप

Nagpur Mayor Sandip Joshi on Tukaram Mundhe

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?