VIDEO : राज्यमंत्री संजय राठोड ‘डॉन’च्या भूमिकेत, व्हिडीओ व्हायरल

VIDEO : राज्यमंत्री संजय राठोड 'डॉन'च्या भूमिकेत, व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ : राज्याचे महसूल राज्यमंत्री आणि यवतमाळचे सहपालकमंत्री संजय राठोड यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संजय राठोड यांनी कौटुंबिक लग्न समारंभात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अगदी मनमुराद डान्स केला.

राज्यमंत्री संजय राठोड यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या घरात लग्न समारंभ होता. संजय राठोड हे या लग्नसोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. यावेळी एका नातेवाईकांनी संजय राठोड यांना डान्स करण्याचा आग्रह केला.

संजय राठोड यांनी नातेवाईकांच्या आग्रहाला मान देत, ‘डॉन’ चित्रपटातील ‘पान बनारसवाला’ या गाण्यावर ठेका धरला. उपस्थितांनीही खुल्या दिलाने संजय राठोड यांच्या डान्सचं टाळ्या वाजवून, कौतुक केलं. संजय राठोड यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय राठोड कोण आहेत?

शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले. 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.

पाहा व्हिडीओ :

Published On - 4:34 pm, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI