AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन

एपीएमसीच्या कायद्यात बदल केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर आज (19 सप्टेंबर) आंदोलन केले (MNS Protest against central government).

एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर मनसेचे काठी घुंगरु आंदोलन
| Edited By: | Updated on: Sep 19, 2020 | 4:56 PM
Share

नवी मुंबईएपीएमसीच्या कायद्यात बदल केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एपीएमसी कांदा बटाटा मार्केट समोर आज (19 सप्टेंबर) आंदोलन केले (MNS Protest against central government). विशेष म्हणजे यावेळी मनसेकडून काठी घुंगरुच्या निनादात शेतकऱ्याच्या प्रतिकात्मक वेशात आंदोलन करण्यात आले (MNS Protest against central government).

केंद्र सरकारने एपीएमसीच्या कायद्यात बदल करून मोठया उद्योजकांना शेती व्यवसायात शिरण्यासाठी लाल गालिचा अंथरला आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाखाली मोठया उद्योजकांना शेती व्यवसाय देण्याचा घाट घातला आहे. यावर महाराष्ट्र राज्यातील सर्वपक्षीय नेते मौन बाळगून बसले आहेत, असा आरोप यावेळी मनसेने केला आहे.

धान्याशी निगडित शेतीबाबत केंद्र सरकारने हा तुघलकी निर्णय घेतला आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर चक्का जाम करण्याचा इशारा मनलेने दिला आहे. या आंदोलनात मनसे सैनिक बाळासाहेब शिंदे, प्रसाद घोरपडे, पप्पू शिंदे, मयूर आदि सहभागी झाले होते. यावेळी सरकारला नारळ भेट देऊन निषेध करण्यात आला.

दरम्यान, निर्यात बंदीचा फरक एपीएमसी मार्केटवर पडला नाही. एपीएमसी मार्केटमध्ये सध्या कांद्याचे दर स्थिर आहेत. नवीन कांदा सध्या बाजारात आला आहे. पण त्याला उठाव नाही. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक होईल, असं एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

एपीएमसीतील मापाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, 4 कोटी 24 लाखांची थकबाकी

एपीएमसीतील मुख्यलेखाधिकाऱ्यांसह सहकाऱ्याला कोरोना, एपीएमसीची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.