AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांच्या कारवाईला सलाम, अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाची तेलंगणातून सुटका

पोलिसांनी तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे चार महिन्यांच्या बाळाची तेलंगाणातून सुटका केली आहे. Mumbai Police rescue for month child and arrested three person

मुंबई पोलिसांच्या कारवाईला सलाम, अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाची तेलंगणातून सुटका
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Edited By: | Updated on: Nov 17, 2020 | 9:47 PM
Share

मुंबई:  मुंबई पोलिसांनी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे. मुंबईतून एका चार महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. मुंबई पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलिसांनी तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्या बाळाची तेलंगणातून सुटका केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 4 लाख रुपयांना बाळाची विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी एका डॉक्टरसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मुंबई पोलीस दलाची मान उंचावली आहे. (Mumbai Police rescue for month child and arrested three person)

मुंबई पोलिसांनी तेलंगणातून बाळाची सुटका करुन ते त्याच्या आई वडिलांकडे सोपवले आहे. मुंबई पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात लहान बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलिसांमध्ये दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी तपासासाठी पथके स्थापन करुन वेगवान तपासाला सुरुवात केली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही पडताळणी केल्यानंतर पुरावे हाती लागले. त्याआधारे ते बाळ तेलंगणामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेलंगणात जाऊन बाळाची सुटका केली आणि आरोपींना अटक केली आहे.

जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढरीनाथ ओव्हाळ यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली. मुख्य आरोपी डॉ. नसरुद्दीन बशीरुद्दीन यांनी महेश दिट्टी आणि रमेश नावाच्या व्यक्तीला बाळाचे अपहरण करण्यास सांगितले होते. या सर्व आरोपींनी या बाळाची मुल नसणाऱ्या एका व्यक्तीला चार लाख रुपयांना विक्री केली होती. जुहू पोलिसांनी सर्व आरोपींवर अपहरण, मानवी तस्करी आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी विविध कलमांखाली अटक केली आहे. जुहू पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

दीड वर्षांपासून लपाछपीचा खेळ, नागपूर पोलिसांनी वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 20 लाखांचं चोरी केलेलं सोनं जप्त

पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट; 55 हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

(Mumbai Police rescue for month child and arrested three person)

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?