Tukaram Mundhe | नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर, आयुक्तांनी समजूतदारपणे घ्यायला हवं होतं, महापौरांची प्रतिक्रिया

जो प्रश्न सभागृहासमोर आला त्यावर आयुक्त उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी उत्तर न देता ते चिडून निघून गेले, असं महापौरांनी सांगितलं.

Tukaram Mundhe | नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर, आयुक्तांनी समजूतदारपणे घ्यायला हवं होतं, महापौरांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 10:47 PM

नागपूर : नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यावरुन (Tukaram Mundhe General Meeting) आधीच आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष रंगला होता. मात्र, राज्य सरकारने सभेला परवानगी दिली आणि आज सभा सुरु झाली. मात्र, प्रश्न उत्तराचा तास सुरु होताच शॉपिंग कॉम्प्लेक्स असलेल्या इमारती साठी प्रस्तावित असलेले बांधकाम बदलून त्या ठिकाणी हॉस्पिटल बनविण्यात आले त्याची परवानगी कोणाकडून घेतली हा प्रश्न काँग्रेसच्या नगर सेवकाने उपस्थिती केला. त्यावरुन संघर्ष व्हायला सुरुवात झाली आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर व्यक्तीगत टीका करण्यात आली. त्यावरुन मुंढे यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहातून (Tukaram Mundhe General Meeting) निघून गेले.

मात्र, हा प्रकार योग्य नव्हता. ते अधिकारी आहे. त्यांना सगळे अधिकार आहेत, ते समजूतदार आहेत. त्यांनी समजूतदारपणे घ्यायला पाहिजे होता. काही आक्षेप होता तर तो भाग कामकाजातून काढून टाकता आला असता, असं महापौर संदीप जोशी म्हणाले (Tukaram Mundhe General Meeting).

जो प्रश्न सभागृहासमोर आला त्यावर आयुक्त उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी उत्तर न देता ते चिडून निघून गेले. जनप्रतिनिधी आपल्या भागातील प्रश्न विचारणार, त्यात त्यांची पद्धत कदाचित चुकीची असेल, पण त्यावर आयुक्तांना आक्षेप घेत आला असता. मात्र, ते सरळ निघून गेले हे योग्य नव्हतं, आता त्यांनी एक पाऊल मागे घ्यावं. आम्ही एक पाऊल मागे घेऊ आणि सभागृहात त्यांनी मंगळवारी यावं, अस महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं.

सभागृह सुरु झाल्यापासूनच आयुक्तांना घेणाऱ्या प्रश्नांची सुरुवात झाली आणि शेवटी आयुक्त सभागृह सोडून निघून गेले. मात्र, जो प्रश्न काँग्रेसच्या नगर सेवकाने उपस्थित केला. त्यासाठी चौकशी समिती नेमणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. मात्र, आता मंगळवारी होणाऱ्या सभेला आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित राहातील की नाही याकडे सध्या सगळ्यांच लक्ष लागून आहे.

Tukaram Mundhe General Meeting

संबंधित बातम्या :

आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप

नागपुरात तुकाराम मुंढेंना शिवसेनेची खंबीर साथ, भाजप-काँग्रेसचा मात्र कडाडून विरोध

हॉल-लॉनमध्ये नाही, घरीच लग्न लावा, तुकाराम मुढेंकडून ‘विवाहनियम’

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.