AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहबाह्य संबंधाचा संशय, नागपुरात पत्नी आणि तिच्या मित्राची हत्या

मयत महिला किरण बरमेया यांचे शिवा नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भारत बरमेया याला होता.

विवाहबाह्य संबंधाचा संशय, नागपुरात पत्नी आणि तिच्या मित्राची हत्या
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jul 27, 2020 | 1:00 PM
Share

नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या. (Nagpur Husband kills wife and her alleged boyfriend suspecting extra marital affair)

नागपुरातील जनता कर्फ्यू संपून काही तास होत नाहीत, तोच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नागपुरातील बेसा परिसरात असलेल्या कल्यानेश्वर नगरमध्ये ही घटना घडली. मयत महिला किरण बरमेया यांचे शिवा नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भारत बरमेया याला होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडायचे.

हेही वाचा : विवाह्यबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप

अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी पतीने पत्नी किरण आणि तिचा मित्र शिवा यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी पती भारत बरमेयाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

नागपूरमधील अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दुसरीकडे, विवाहबाह्य प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय तरुणाला दुबईमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी 9 सप्टेंबरला आरोपी पती युगेशने पत्नी विद्या चंद्रनची ऑफिसच्या पार्किंगमध्ये भरदिवसा चाकूने वार करुन हत्या केली होती.

(Nagpur Husband kills wife and her alleged boyfriend suspecting extra marital affair)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...