मध्यप्रदेश सरकारला जमलं, राज्यसरकारला का नाही?, देवीच्या मूर्तींच्या उंचीवरील निर्बंधामुळे नागपुरातील मूर्तीकार संतप्त

| Updated on: Oct 08, 2020 | 7:29 PM

नवरात्रोत्सवासाठी देवीची मूर्ती किती उंचीची असावी याबाबत अजूनही आपल्या राज्यात एकमत झालेले नाही.

मध्यप्रदेश सरकारला जमलं, राज्यसरकारला का नाही?, देवीच्या मूर्तींच्या उंचीवरील निर्बंधामुळे नागपुरातील मूर्तीकार संतप्त
Follow us on

नागपूर : अनलॉकच्या काळात सरकारने सर्व उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे (Nagpur Sculptors Situation). मात्र, मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध अद्याप कायम आहेत. त्यामुळे नागपूरचे पारंपरिक मूर्तीकार संतप्त झाले आहेत. आता या मुर्तीकारांना मध्य प्रदेशमधील नवरात्रोत्सवसाठी मूर्तीच्या ऑर्डरची आस आहे (Nagpur Sculptors Situation).

नवरात्रोत्सवासाठी देवीची मूर्ती किती उंचीची असावी याबाबत अजूनही आपल्या राज्यात एकमत झालेले नाही. मात्र, शेजारी असलेल्या मध्यप्रदेश राज्यात आठ फुटांपर्यंतच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘जे मध्यप्रदेश सरकारला जमले, ते महाराष्ट्राला का जमत नाही?’, असा प्रश्न नागपूरच्या मूर्तीकारांना पडला आहे. गणेशोत्सवासाठी मूर्तींची उंची चार फुटांपेक्षा जास्त नसावी, असा नियम होता. तोच नियम आता नवरात्रोत्सवासाठी सुद्धा कायम असल्याचे निश्चत होण्याच्या मार्गावर आहे.

मूर्तींची उंची बघून कोरोनाचा प्रादुर्भाव होतो का?, असा संतप्त प्रश्न नागपूरच्या मूर्तीकारांनी राज्य शासनाला केला आहे. कोरोना महामारीच्या संकटात अनेक उद्योग धंदे रसातळाला गेले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सर्व पूर्वीसारखे सुरळीत होईल, या आशेवर सहा ते सात महिने लोटले. मात्र, अनेक छोटे व्यावसायिक नव्याने व्यवसाय सुरु करण्याची उमेद हरवून बसले आहेत. अशीच काहीशी अवस्था पारंपरिक मूर्तीकारांची आहे (Nagpur Sculptors Situation).

कोरोना काळातच संपूर्ण मूर्ती उत्सवांचा सिझन निघून गेल्याने मूर्तीकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे नागपूरच्या चितारओळीतील मुर्तीकारांना मध्यप्रदेश मधून मिळणाऱ्या ऑर्डरची आस लागली आहे.

या वर्षातील शेवटी संधी म्हणून मूर्तीकार नवरात्रीकडे बघत आहेत. राज्यात चार फुटांच्या मूर्तींची अट कायम असल्याने मूर्तीकारांचे आर्थिक चक्र रुळावर येण्यात अडसर आला आहे. विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यातून देवीच्या मूर्तींचे ऑर्डर नागपुरातील मूर्तीकारांना मिळतात. तेथून सात ते आठ फुटांच्या मूर्तींचे ऑर्डर मिळू लागले आहेत. त्यामुळे आपल्याच राज्यात चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींना परवानगी का नाही, असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे.

Nagpur Sculptors Situation

संबंधित बातम्या :

दुर्गा मूर्ती उंचीवर मर्यादा, शासनाच्या परिपत्रकाचा मूर्तिकारांना आर्थिक फटका

यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांविनाच, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी