मुख्यमंत्र्यांचं दत्तक घेतलेल्या नाशिकला सर्वात मोठं गिफ्ट

राज्यातल्या या पहिल्याच प्रोजेक्टच्या मंजुरीसाठी हा प्रकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प आणत विधानसभेच्या तोंडावर भाजपने मास्टरस्ट्रोक मारल्याचं बोललं जातंय.

मुख्यमंत्र्यांचं दत्तक घेतलेल्या नाशिकला सर्वात मोठं गिफ्ट
Follow us
| Updated on: Jul 22, 2019 | 8:44 PM

नाशिक : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रोजेक्ट (Nashik metro) लवकरच नाशिकमध्ये सुरु केला जाणार आहे. 2000 कोटी रुपयांच्या या मेगा प्रोजेक्टच्या माध्यमातून शहरातील दोन प्रमुख मार्गांवर टायर बेस मेट्रो धावणार आहे. येत्या चार वर्षात हे काम पूर्ण होईल. राज्यातल्या या पहिल्याच प्रोजेक्टच्या मंजुरीसाठी हा प्रकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प (Nashik metro) आणत विधानसभेच्या तोंडावर भाजपने मास्टरस्ट्रोक मारल्याचं बोललं जातंय.

तिर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या नाशिकला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांआधी दत्तक घेतलं. मुख्यमंत्र्यांनी नशिक दत्तक घेतल्यानंतर विरोधकांनी टीका तर केलीच, पण नेमकं नाशिकला मुख्यमंत्र्यांकडून काय मिळालं याबाबत अनेकदा आरोपही झाले. मात्र 2000 कोटी रुपयांचा मेगा टायर बेस मेट्रो प्रोजेक्ट देऊन मुख्यमंत्र्यांनी नाशिकला मोठं गिफ्ट दिलं आहे.

कसा असेल टायर बेस मेट्रो प्रोजेक्ट?

नाशिकसाठी तयार करण्यात आलेल्या मेट्रोचं नाव मेट्रो नियो असेल. ओव्हरहेड ट्रॅक्शनवर मेट्रो नियो चालेल. शहराच्या महत्त्वाच्या टोकांना जोडण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. प्रत्येक मेट्रोसाठी 25 मीटर लांबीचे इलेक्ट्रिक कोच असतील. एकावेळी या कोचमध्ये 240 ते 250 प्रवासी प्रवास करु शकतील. पहिल्या टप्प्यात दोन कॉरिडॉर आहेत. गंगापूर रोड ते नाशिक रोड असा 22 किमीचा पहिला कॉरिडॉर आहे, ज्यात 19 स्टेशनचा समावेश आहे. तर गंगापूर ते मुंबई नाका असा 10 किमीचा दुसरा मार्ग आहे, ज्यात 10 स्टेशन असतील. दोन फिडर कोच रुटही यामध्ये असतील. दोन्ही रुटसाठी सीबीएस हे मध्यवर्ती जोडणारं स्टेशन असेल.  आरामदायक सिट्स, ऑटोमेटीक दरवाजे या मेट्रोला असतील.

या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचं काम चार वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये महामेट्रोचा समावेश असल्याने मुख्यमंत्र्यांनीही या प्रोजेक्टसाठी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. नाशिकला मेट्रो सेवा सुरु होणार असल्याने एकीकडे नाशिककरांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामाप्रमाणे महामेट्रोचं काम रखडू नये, अशीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची माहिती यापूर्वी विधानसभेतच दिली होती. नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो आणण्यासाठी काम सुरु आहे. त्याचा आराखडाही तयार झालाय. हायब्रीड मेट्रोचं मेट्रोमध्ये रुपांतर करणं सहज शक्य आहे. दोन्ही मेट्रोच्या किंमतीमध्ये मोठा फरक आहे. हायब्रीड मेट्रोसाठी प्रति किमी 50 कोटी, तर मेट्रोसाठी प्रति किमी 275 कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.