ZARA कसा बनला टॉपचा ब्रँड, एक डिलिव्हरी बॉय ते करोडपती बिझनेस मॅन, जाणून घ्या
ZARA शॉप जगप्रसिद्ध आहेत, सर्वसामान्यांच्या खिशाला सोडा कल्पनेच्या आवाक्या बाहेर अशी किंमती कपड्यांच्या पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती का या झाराचे मालक यांची सुरूवात एक डिलिव्हरी बॉय म्हणू झालेली. त्यानंतर असा काय चमत्कार झाला? झाराचे मालक जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांनी स्थान मिळवलं, वाचा सविस्तर.

जगभरात एकापेक्षा एक असे अनेक यशस्वी उद्योजक आहेत. ज्यांनी शून्यातून सुरूवात करून यशाचं शिखर गाठलं. याच पठडीत एक असं नाव आहे, ज्यांनी आपलं घर चालण्यासाठी शाळा सोडली. डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरूवात केली. पण, त्याच डिलिव्हरी बॉयने आपल्या मेहनतीच्या, कर्तुत्वाच्या बळावर यशाची एकेक पायरी चढली. यशस्वी उद्योजक झाला. करोडो रुपयांची त्याची मालमत्ता जमली. इतकंच नाही तर त्या उद्योजकाने जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत आपले नाव नोंदवले. हा यशस्वी उद्योजक दुसरे तिसरे कोणी नाही तर झारा कंपनीचे मालक अमानसियो ऑर्टेगा आहे. जगातील मोठी फॅशन ब्रँड कंपनी ‘Zara’ झारा ही जगातील एक मोठी फॅशन ब्रँड कंपनी आहे....
