AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिकपर्यंत हंगामा

मतदानाच्या दिवशी मुंबईत ते नाशिकपर्यंत राजकीय हंगामा पाहायला मिळाला. मुंबईतच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं आमदार सुनिल राऊत भडकले. तर नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिकपर्यंत हंगामा
shailesh musale
shailesh musale | Updated on: May 21, 2024 | 1:09 AM
Share

पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिकपर्यंत हंगामा झाला. संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनिल राऊत आणि पोलिसांमध्ये भांडुपच्या पोलिंग बुथच्या बाहेर चांगलीच बाचाबाची झाली. पोलिसांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं सुनिल राऊत मतदान केंद्राबाहेर आले.

मतदान केंद्राच्या बाहेर काही अंतरावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते डमी EVM मशीनद्वारे प्रात्यक्षिकं दाखवत होते..त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र लोकांमध्ये जनजागृती करणं चूक आहे का ? असा सवाल करत सुनिल राऊत पोलिसांवर भडकले.

ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते 100 मीटरच्या बाहेर, डमी मशिनद्वारे जनजागृती करत होते..त्यामुळं काही वेळात या दोघांनाही सोडून देण्यात आलं. इकडे नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मतदान केंद्रावर शांतिगिरी महाराजांच्या नावानं चिठ्ठ्या वाटत असल्याच्या आरोपात, म्हसरुळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतलं. तर शांतीगिरी महाराजांच्या समर्थकांनी जय बाबाजी नावाचे स्टिकरही लावले होते. ज्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला.

तर शांतिगिरी महाराज आपल्या कृतीनंही अडचणीत आलेत. मतदानावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षावरच हार घालता. त्यानंतर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्येच, माऊली लॉन्स परिसरात मतदान केंद्रावर जेवण घेवून जाणाऱ्या शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे आणि भाजपच्या आमदार सीमा हिरेही त्या मतदान केंद्रावर आल्या आणि त्या अधिकाऱ्याला जाब विचारला.

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट आरोप केला. मुंबईत दिवसभर संथ गतीनं मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यावरुन पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी, ज्या ठिकाणी शिवसेनेला मतदान होतंय, त्याच ठिकाणी विलंब होत असल्याचा आरोप केला.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...