AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेंद्रसिंह धोनीने आरसीबीकडून पराभूत होण्याआधीच मौन सोडलं होतं, स्पष्टच सांगितलं की…

आयपीएल 2024 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ पोहोचू शकला नाही. नेट रनरेट कमी पडल्याने ही नामुष्की ओढावली. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने प्रयत्न केला खरा पण त्यात काही यश आलं नाही. अखेर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. या पराभवापूर्वी धोनीने दुबई आय 103.8 शी बोलताना चेन्नई सुपर किंग्सबाबत मोठी गोष्ट सांगितली.

महेंद्रसिंह धोनीने आरसीबीकडून पराभूत होण्याआधीच मौन सोडलं होतं, स्पष्टच सांगितलं की...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 20, 2024 | 11:00 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेनंतर मेगा लिलावाची उत्सुकता लागणार आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत खेळाडूंची उलथापालथ होताना दिसणार आहे. तसेच मोठी बोली लावून खेळाडूंचा भावही वधारणार आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या 18व्या पर्वात खेळणार की नाही याची उत्सुकता लागून आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याचा निर्णय आता लंडनमध्येच होईल असं वाटत आहे. कारण महेंद्रसिंह धोनीला गुडघ्याची दुखापत झाली असून लवकरच शस्त्रक्रियेसाठी लंडनला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर पुढच्या पर्वात खेळणार की नाही याचा निर्णय होणार आहे. पण धोनीने याबाबत अजूनही काहीही सांगितलेलं नाही. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनानेही याबाबत काहीच स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस फक्त यावर चर्चा रंगणार असंच दिसत आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनी रांचीत परतला आहे. या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो आदर मिळवावा लागतो असं सांगत आहे. दुबई आय 103.8 शी बोलताना धोनीने चेन्नई सुपर किंग्सबाबत एक भावनिक गोष्टही सांगितली.

महेंद्रसिंह धोनीने दुबई आय 103.8 शी बोलताना सांगितलं की, “एक लीडर म्हणून तुम्हाला आदर मिळवावा लागेल. लोकांना आदेश देऊन आदर मिळवू शकत नाही. सन्मान मिळवावा लागेल. उदाहरण देऊन तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं. यशाच्या वेळी तुम्ही आम्हाला सांगू शकता की आम्ही असं केलं पाहीजे. पण जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा तुमच्या वागण्यात बदल नसावा. हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला आदर मिळेल.”

“चेन्नई सुपर किंग्ससोबत माझं भावनिक नातं आहे. नुसतं खेळाडू म्हणून खेळायचं आणि घरी यायचं असं नाही ते..आपण खेळात व्यवसायिक असण्याबद्दल बोलतो. पण भारतात असं होत नाही. भारतात आम्ही व्यवसायिक तसेच भावनिकही आहोत. आम्ही संघासोबत किंवा व्यक्तीशी भावनिक नाळ जोडतो. भावनिक नातं ही माझी ताकद आहे”, असं महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्सबाबत सांगितलं.

चेन्नई सुपर किंग्सचं यंदा नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर होतं. स्पर्धा सुरु होण्याच्या काही तासांआधी ही धुरा त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. मात्र मैदानात धोनीची सूत्र फिरत असल्याचं दिसून आलं आहे. डीआरएस घ्यायचा असेल तर गोलंदाज पहिल्यांदा धोनीकडे पाहात असे, त्यानंतर कौल ऋतुराजकडे मागितला जात असे, असं चित्र होतं. त्यामुळे चेन्नईला पाचवेळा जेतेपदाची चव चाखायला देणारा थलायवया किती महत्त्वाचा आहे हे दिसून येतं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.