AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदीचा बंगला पाडणार

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा चुना लावून पसार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागजवळील अनधिकृत बंगला पाडण्‍याचे आदेश जारी केल्याचे राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. याबाबत रायगड जिल्‍हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी हा बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. हिरा व्यापारी नीरव मोदी याचा हा अनधिकृत बंगला अलिबागजवळील किहीमच्या समुद्रकिनारी आहे. वकील पी बी काकडे यांनी […]

मोदीचा बंगला पाडणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला करोडोंचा चुना लावून पसार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागजवळील अनधिकृत बंगला पाडण्‍याचे आदेश जारी केल्याचे राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. याबाबत रायगड जिल्‍हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी हा बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. हिरा व्यापारी नीरव मोदी याचा हा अनधिकृत बंगला अलिबागजवळील किहीमच्या समुद्रकिनारी आहे. वकील पी बी काकडे यांनी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश एमएस कार्णिक यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, राज्य सरकार आणि तटीय क्षेत्रांच्या नियमांचे उल्लंघन करत निर्माण केलेल्या 58 खासगी संपत्तींना पाडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीमध्ये तटीय क्षेत्रात अवैधरित्या आणि तटीय क्षेत्रांच्या नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आलेल्या खासगी संपत्तींवरील करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मागितली होती. त्यावर सरकारने न्यायालयात सादर केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, नीरव मोदी याचा अलिबागजवळील अनधिकृत बंगला पाडण्‍याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

प्रसिद्ध हिरा व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा गंडा घातला होता. त्यानंतर त्याने विदेशात पळ काढला.

मोदीचा जवळपास 30 हजार चौरस फुटाचे बांधकाम असलेला हा बंगला सध्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केला आहे. याला पाडण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच हा बंगला पाडण्यात येणार आहे. मात्र आज यावर कारवाई होण्याची शक्यता नाही. या प्रकरणी पुढील सुणावणी 20 डिसेंबरला होणार आहे.

Follow Us
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...