AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nissan च्या ‘या’ कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या पाच दिवसात 5000 बुकिंग्सचा टप्पा पार

Nissan Motors ने बुधवारी (2 डिसेंबर) त्यांची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite भारतात लाँच केली आहे.

Nissan च्या 'या' कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या पाच दिवसात 5000 बुकिंग्सचा टप्पा पार
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 08, 2020 | 5:31 PM
Share

मुंबई : Nissan Motors कंपनीने बुधवारी (2 डिसेंबर) त्यांची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही Nissan Magnite भारतात लाँच केली आहे. कंपनीने ही एसयूव्ही (SUV) चार ट्रिम्समध्ये लाँच केली आहे. Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही 4.99 लाख रुपयांच्या किंमतीत (एक्स-शोरूम किंमंत) लाँच करण्यात आली आहे. या कारला भारतीय ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसात या कारच्या 5 हजार युनिट्सची बुकींग पूर्ण झाली आहे. (Nissan Magnite gets 5000 bookings in 5 days, max traction for top variants)

निस्सान मॅग्नाईट सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये दुसऱ्या गाड्यांना जोरदार टक्कर देत आहे. किआ सोनेट, हुंडई वेन्यू (Kia Sonet), मारुती सुझुकी विटारा ब्रेजा (Maruti Suzuki Vitara Brezza), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), महिंद्रा XUV 400 (Mahindra XUV 400) आणि इतर सबकॉम्पॅक्ट एसयूव्हींना मॅग्नाईटने मोठं आवाहन आहे. दरम्यान कंपनीने याबाबत सांगितले की, आतापर्यंत जितक्या बुकिंग्स झाल्या आहेत. त्यापैकी 60 टक्के बुकिंग्स कारच्या टॉप दोन व्हेरियंट्साठी आल्या आहेत.

या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये इतकी आहे. ही इंट्रोडक्ट्री किंमत केवळ त्याच ग्राहकांसाठी आहे जे ग्राहक 31 डिसेंबरपर्यंत ही कार बुक करतील. त्यानंतर निसान मॅग्नाइटची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये इतकी होणार आहे. किया मोटर्सने त्यांची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सोनेट जेव्हा लाँच केली होती. तेव्हा त्या कारच्या 6500 बुकिंग्स आल्या होत्या.

दरम्यान, कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.

⦁ LED DRL, LED इंडिकेटर

⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स

⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

‘या’ गाड्यांना टक्कर देणार

Nissan Magnite ची मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza), ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), फोर्ड इकोस्पोर्ट (Ford Ecosport), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300), टोयोटा अर्बन क्रुझर (Toyota Urban Cruiser), होंडा WR-V (Honda WR-V) आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट (Kia Sonet) या कारशी थेट टक्कर होणार आहे.

संबंधित बातम्या

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

नवीन MPV Suzuki Solio Bandit लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टोयोटाची शानदार Innova Crysta लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Nissan Magnite gets 5000 bookings in 5 days, max traction for top variants)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा