VIDEO: नागपूरमध्ये गडकरी आणि फडणवीसांची बोलिंग, हार्दिक पांड्याची जोरदार फटकेबाजी

राजकारणात आपल्या अनेक वक्तव्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना गुगली टाकणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये खरीखुरी बोलिंग केली (Nitin Gadkari Devendra Fadnavis ball Hardik Pandya).

VIDEO: नागपूरमध्ये गडकरी आणि फडणवीसांची बोलिंग, हार्दिक पांड्याची जोरदार फटकेबाजी
Follow us
| Updated on: Jan 24, 2020 | 9:34 PM

नागपूर : राजकारणात आपल्या अनेक वक्तव्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना गुगली टाकणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये खरीखुरी बोलिंग केली (Nitin Gadkari Devendra Fadnavis ball Hardik Pandya). ही बोलिंग दुसरं तिसरं कुणाला नाही, तर थेट भारतीय क्रिकेटसंघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला केली आहे. ते नागपूरमध्ये सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सावाच्या समारोप प्रसंगी आले असताना खेळत होते. या दुर्मिळ योगायोगाने नागपूरकरांना मात्र चांगलाच आनंद झाला.

नागपूरमधील खासदार क्रीडा महोत्सवाचा आज (24 जानेवारी) समारोप झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारताचा प्रसिद्ध स्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या उपस्थित होते. यावेळी मंचावरच या दिग्गजांचा क्रिकेट सामना रंगला. गडकरी आणि फडणवीस यांनी हार्दिक पांड्याला गोलंदाजी केली. यावेळी पांड्याने जोरदार फटकेबाजी केली.

नागपूरमधील क्रीडा प्रेमींसाठी हार्दिक पांड्याची कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती विशेष आकर्षित ठरली. यावेळी त्यालाही प्रेक्षकांसह सेल्फी घेण्याची मोह आवरला नाही आणि त्याने सेल्फी घेत क्रीडा प्रेमींच्या उत्साहात भर टाकली. यावेळी हार्दिक पांड्याची मुलाखत देखील घेण्यात आली. हार्दिकने या मुलाखतीत सावधपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.

Non Stop LIVE Update
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.