AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Nitin Gadkari on Corona).

Nitin Gadkari Exclusive | मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख PPE किट पाठवतो : गडकरी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 24, 2020 | 7:24 PM
Share

मुंबई : “मुख्यमंत्र्यांशी माझा संवाद आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहोत (Nitin Gadkari on Corona). महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत, हा राजकारणाचा वेळ नाही, एकमेकाला दोष देण्याची वेळ नाही. एकमेकांना मदत करण्याची ही वेळ आहे. संकटावर मात करायची आहे. भारत सरकारचं, आम्हा सर्वांचं त्यांना सहकार्य आहे”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Nitin Gadkari on Corona).

“पीपीईबद्दल मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवर सांगितलं. ते म्हणाले मी कलेक्टरशी बोलतो. त्यानंतर मग मी स्वत: नागपूरच्या कलेक्टरना सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, जरुर ती व्यवस्था करुन द्या. जर मुख्यमंत्र्यांनी मला जरी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, त्यांना लाख-दीड लाख पीपीई किट नागपूरहून मुंबईला पाठवायला तयार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याबाबत समन्वय नीट झाला, तर आपल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतील. मात्र त्यामध्ये एकदिशा असावी”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“आम्ही नागपूरला एकाकडून सीएसआरमधून 1 कोटी रुपये घेतले. त्यातून आम्ही 15 हजार पीपीई किट घेतल्या आणि अनेक रुग्णालयांना त्या मोफत दिल्या. आमच्याकडे एमईसीएमचा रेडिमेड गारमेंट झोन आहे. तिथे 1200 महिला काम करतात. महाराष्ट्राला हव्या आहेत तेवढ्या पीपीई किट्स केवळ नागपूरमधून मिळू शकतात. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याची कल्पना दिली. इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“पीपीई किट्स किंमत 1200 रुपये होती. त्या 650 रुपयांमध्ये मिळतात. त्याला मंजूरी मिळाली आहे. त्याबाबत सर्व अहवाल आहेत. पाहिजे असेल तर मुंबईत कमीतकमी 25 हजार प्रतिदिन प्रमाणे ताबडतोब 2 ते 3 लाख किट पाठवता येतील. पण मला वाटतं यात जी निर्णय घेण्याची जी पद्धत आहे त्यात सर्वजण एकमेकांना विचारतात. खरंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गरज असेल तर याबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावेत. तसेच महाराष्ट्रात अशाप्रकारे कोठे कोठे उपलब्ध होऊ शकेल? याबाबतही त्यांनी विचार करावा. विशेषतः आपल्याकडे सॅनिटायझर आहे. आपण अनेक साखर कारखान्यांना सॅनिटायझर तयार करण्यासाठी परवानगी दिली”, असं गडकरी यांनी सांगितलं.

“मी स्वतः आमच्या कारखान्यातून 1 लाख सॅनिटायझर बाटल्या मोफत वाटल्या. जे आधी 1200 रुपये लिटरला विकलं जायचं ते आता 400 रुपये लिटरने विकलं जातं. महाराष्ट्र सरकारने याची किंमत 500 रुपये ठेवली आहे. असं करुन आम्ही मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती, नगरपालिका यांना वाटप केले. त्यामुळे आता सॅनिटायझर आणि पीपीई किटची कमतरता नाही. उलट मला सॅनिटायझरवाल्याने त्यांच्याकडे अधिकचं उत्पादन असल्याचं सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!