सैन्य भरतीचा भोंगळ कारभार, तरुणांना रस्त्यावर झोपण्याची वेळ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

नाशिक : नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये सैन्य भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या सैन्य भरतीसाठी राज्यभरातून प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची कोणतीही व्यवस्था नसल्याने कडाक्याच्या थंडीत या तरुणांना गुराढोरासारखं राहावं लागलं. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक तरुणांना या ठिकाणी मारहाण देखील झाल्याने या भरती प्रक्रियेच्या व्यवस्थेबाबत संताप व्यक्त होतो आहे.. रस्त्याच्या कडेला झोपलेले […]

सैन्य भरतीचा भोंगळ कारभार, तरुणांना रस्त्यावर झोपण्याची वेळ
Follow us on

नाशिक : नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये सैन्य भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या सैन्य भरतीसाठी राज्यभरातून प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची कोणतीही व्यवस्था नसल्याने कडाक्याच्या थंडीत या तरुणांना गुराढोरासारखं राहावं लागलं. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक तरुणांना या ठिकाणी मारहाण देखील झाल्याने या भरती प्रक्रियेच्या व्यवस्थेबाबत संताप व्यक्त होतो आहे..

रस्त्याच्या कडेला झोपलेले हे मुलं सैन्य भरतीसाठी नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या देवळाली आर्टलरी सेंटरमध्ये सैन्य भरती असल्याची जाहिरात काही दिवसांपूर्वी आली आणि हजारोंच्या संख्येने बेरोजगार तरुण या भरतीसाठी नाशिकमध्ये आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मुलांची कोणतीही व्यवस्था नसल्याने नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत अनेकांना रस्त्याच्या फुटपाथवरच रात्र जागून काढावी लागली. काहींनी शेकोटीचा आसरा घेतला तर अनेकांकडे साधा स्वेटर देखील नसल्याने नाशिकच्या थंडीत ते गारठून गेले.

इथल्या गोंधळात आणि गर्दीत अनेकांच्या चपला बूट देखील हरवले. त्यामुळे अनेकांना अनवाणीच परतीचा प्रवास करावा लागला.

सैन्याय भरती होण्याचं स्वप्न उराशी घेऊन राज्यभरातून आलेल्या या तरुणांना निराश होऊन परतावं लागलं. तीन दिवस नाशिकमध्ये ही भरती प्रक्रिया चालणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या भरती प्रक्रियेचे तीनेतेरा वाजल्याचं बघायला मिळालं.