AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किम जोंग उनची क्रूरता, जनरलला हिंस्र माशांच्या तलावात फेकलं

उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी आपल्या जनरलची नरभक्षी  पिरान्हा माशांच्या तलावात फेकून निर्घृण हत्या केली आहे.

किम जोंग उनची क्रूरता, जनरलला हिंस्र माशांच्या तलावात फेकलं
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 11, 2019 | 5:08 PM
Share

सेऊल : उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी आपल्या जनरलची नरभक्षी  पिरान्हा माशांच्या तलावात फेकून निर्घृण हत्या केली आहे. जनरलवर किम जोंग यांच्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप होता. ही माहिती जोंग यांना कळताच त्यांनी जनरल याची निर्घृण प्रकारे हत्या केली आहे. नुकतेच जोंग यांनी अमेरिकेत आपल्या दुतांसह पाच अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.

मृत्यूचे कारण अस्पष्ट

किम जोंग यांच्या क्रूर निर्णयांची जगभरात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रत्येकजण जोंग यांच्यावर टीका करत आहेत. जनरल यांना माशांच्या हल्ल्यानंतर मारले, त्यांच्यावर चाकूने हल्ला केला की त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

ब्राझीलवरुन पिरान्हा माशांची खरेदी

किम जोंग उन यांनी ब्राझीलवरुन पिरान्हा माशांची खरेदी केली असल्याचे म्हटलं जात आहे. पिरान्हा मासा हा जगातील सर्वात नरभक्षी आणि हिंस्र मासा आहे. या माशांच्या दातांना खूप धार असते. या दातांनी ते एका माणसाला कापू शकतात. माणसांसाठी हा मासा धोकादायक आहे.

निर्घृण हत्येची प्रकरणं

किम जोंग हे आपल्या सहकाऱ्यांना खास संदेश देण्यासाठी निर्घृण हत्येच्या पद्धतीचा वापर करतात. जोंग यामधून संदेश देतात की, जे कुणी माझ्यासोबत विश्वासघात करेल त्याला मी अशी शिक्षा देईल. किम जोंग यांनी आपल्या घरातील काही सदस्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही मारुन टाकलं आहे. याचे कारण असे की, जोंग यांच्या भाषणावेळी त्यांनी टाळ्या वाजवल्या नव्हत्या. या छोट्याश्या कारणामुळे त्यांनी आपल्या जवळील लोकांना मृत्यूदंड दिला होता, असं म्हटलं जाते.

Follow Us
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार