गाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात, सोलापुरात ग्राम पंचायतीत अधिकाऱ्यांची दारु पार्टी

सोलापूरातील वैराग ग्रामपंचायत कार्यालयात चक्क अधिकारी दारुची पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. (Solapur Gram Panchayat Daru party)

गाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात, सोलापुरात ग्राम पंचायतीत अधिकाऱ्यांची दारु पार्टी
Follow us
| Updated on: May 29, 2020 | 12:41 PM

सोलापूर : गाव कोमात अन प्रशासनाची दारु पार्टी जोमात अशीच परिस्थिती कोरोनाच्या संकटात सोलापुरात पाहायला मिळाली. (Solapur Gram Panchayat Daru party) कोरोनामुळे सोलापूर जिल्हाही प्रतिबंधित क्षेत्र असताना, वैराग ग्रामपंचायत कार्यालयात चक्क अधिकारी दारुची पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. वैरागमध्ये म्हणजे बार्शी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला. जिल्हा प्रशासनाकडून वैरागला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. (Solapur Gram Panchayat Daru party) मात्र याच वैराग ग्रामपंचायत कार्यालयात चक्क अधिकारी दारुची पार्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एकीकडे जिल्हाप्रशासन रात्रंदिवस राबतंय. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनातील अधिकारीच पार्ट्यांमध्ये दंग असल्याचं चित्र आहे. स्थानिक प्रशासनातील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, कार्यालयीन अधीक्षक विलास मस्के, बांधकाम अभियंता जाधव, लिपिक शेख हे वैराग ग्रामपंचायत कार्यालयात दारु पार्टीत व्यस्त होते.

या पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोलापूरचे पोलीस अधीक्षक बार्शी दौऱ्यावर आले असतानाच, अधिकाऱ्यांना दारु, गुटखा अशा अवैध धंद्यांवर कारवाई करा असा आदेश देऊन गेले होते. हे सर्व खोटं ठरवत प्रतिबंधित क्षेत्रात दारु येते, पार्ट्या होतात म्हणजे स्थानिक पोलिसांच्या कामाबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

गावकऱ्यांकडून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली जात आहे. या घडलेल्या असंवेदनशील प्रकारात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे काय कारवाई करतात याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.

Solapur Gram Panchayat Daru party

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.