VIDEO : नीट उभं राहता येत नाही, पण पट्टीची स्वीमर, एक वर्षाच्या मुलीची कमाल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं म्हटलं जाते. हीच लहान मुलं कधी कधी असं काही करतात की ते पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या फ्लोरिडामधील एका लहान मुलीचा व्हिडीओ मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक वर्षाची मुलगी इतर कुणाच्या मदतीशिवाय स्विमिंग करताना दिसत आहे. हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. यामध्ये मुलगी […]

VIDEO : नीट उभं राहता येत नाही, पण पट्टीची स्वीमर, एक वर्षाच्या मुलीची कमाल
Follow us on

मुंबई : लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं म्हटलं जाते. हीच लहान मुलं कधी कधी असं काही करतात की ते पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या फ्लोरिडामधील एका लहान मुलीचा व्हिडीओ मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक वर्षाची मुलगी इतर कुणाच्या मदतीशिवाय स्विमिंग करताना दिसत आहे. हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

यामध्ये मुलगी पाण्यामध्ये बॅक-स्ट्रोक, फ्रंट क्रॉल आणि स्पिन करताना दिसत आहे. एका वर्षाच्या लहान मुलीला अशी स्विमिंग करुन पाहताना प्रत्येकाला हा चमत्कार वाटत आहे. एक वर्ष म्हटले की, लहान मुलांना नीट चालताही येत नाही. मात्र या वयात उत्कृष्ट अशी स्विमिंग ही लहान मुलगी करत आहे.

“लहान वयातच मुलांना स्विमिंग करता आलं पाहिजे. कारण लहान वयातच मुलांनी पाण्यात राहून मजबूत असा आत्मविश्वास तयार करावा”, अशी इच्छा फ्लोरिडाच्या ग्रेस फनेल्ली यांनी व्यक्त केली.

ग्रेस फनेल्लीच्या दोन मुली आहेत. एक मुलगी तीन वर्षाची आणि दुसरी दोन वर्षाची आहे. विशेष म्हणजे ग्रेसने आपल्या दोन्ही मुलींना स्विमिंग मास्टर बनवले आहे.

दोन्ही मुलींनी 9 महिन्यामध्येच स्विमिंग शिकली आहे. व्हिडीओमध्ये ग्रेस फनेल्लीची छोटी मुलगी स्विमिंग करताना दिसत आहे. 1 वर्षाच्या मुलीला असं स्विमिंग करताना पाहणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही.

“कोणताही मुलगा जन्म घेतल्यानंतर 6 महिन्याने स्विमिंग शिकू शकतो. मी जगातील सर्व मुलांच्या आई-वडिलांना सांगेल की, स्विमिंग येणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व मुलांनी हे शिकणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या कमी वयातच पाण्यामध्ये कम्फर्टेबल राहता आलं पाहिजे. कारण गरजेला ते स्वत: चं संरक्षण करु करु शकतात”, असं ग्रेस म्हणाली.