VIDEO : पाकिस्तानचा नवा ‘चांद नवाब’, गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग

| Updated on: Jul 28, 2019 | 5:31 PM

पूरस्थिती दाखवण्यासाठी हा पत्रकार स्वत: गळ्यापर्यंत पाण्याखाली गेला आणि त्या स्थितीत त्याने रिपोर्टिंग केली. या पत्रकाराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

VIDEO : पाकिस्तानचा नवा ‘चांद नवाब’, गळ्यापर्यंत पाण्यात बुडून रिपोर्टिंग
Follow us on

इस्लामाबाद : सध्या देशात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. भारतासोबतच पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सिंधू नदीला पूर आला आहे. याच नदीची स्थिती दाखवण्यासाठी पाकिस्तानातील एका पत्रकाराने थेट नदीपात्रात डुबकी घेतली. पूरस्थिती दाखवण्यासाठी हा पत्रकार स्वत: गळ्यापर्यंत पाण्याखाली गेला आणि त्या स्थितीत त्याने रिपोर्टिंग केली. या पत्रकाराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

व्हिडीओमध्ये हा पत्रकार गळ्यापर्यंत पाण्याखाली असल्याचं दिसत आहे. तो कसाबसा त्याचा बूम सांभाळतो आहे आणि रिपोर्टिंग करतो आहे. व्हिडीओमध्ये पत्रकार सिंधू नदीच्या पूराबाबत जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. मात्र, त्याच्या रिपोर्टिंग करण्याच्या पद्धतीमुळे हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यापूर्वीही पाकिस्तानी पत्रकार चांद नबावचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गळ्यापर्यंत पाण्याखाली असलेल्या या पत्रकाराची पत्रकारिता पाहून सोशल मीडियावर अनेकजण या व्हिडीओची खिल्ली उडवत आहेत. पाकिस्तानी पत्रकार जावेरिया सिद्दिकीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. त्यांच्या ट्वीटवर अनेकजण कमेंट करत आहेत. यामध्ये काहीजण या व्हिडीओची खिल्ली उडवत आहेत, तर काहीजण याला धोकादायक पत्रकारिता म्हणत आहेत.

संबंधित बातम्या :

चंद्रयान 2 मोहिमेचे पाकिस्तानकडूनही भारताचे कौतुक

इराण-ब्रिटन-अमेरिकेच्या वादात भारतीयांचे हाल, 54 पैकी 9 भारतीयांची सुटका

रशियन ब्युटी क्वीनसोबत लग्नासाठी राजघराणं सोडलं, वर्षभरातच घटस्फोट

…. म्हणून काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाला एंट्री नाही