AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur | आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण, प्रदक्षिणा मार्गावरील काही भाग सील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला असला तरी बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे.

Pandharpur | आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात 'कोरोना'ग्रस्त रुग्ण, प्रदक्षिणा मार्गावरील काही भाग सील
| Updated on: Jun 28, 2020 | 12:39 PM
Share

पंढरपूर : ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावरच पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पंढरपूर मंदिर परिसराचा बाधित भाग सील केला जाणार आहे. आषाढी एकादशी तीन दिवासावर आली असताना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. (Pandharpur Corona Patient found ahead of Ashadhi Ekadashi)

पंढरपूर तालुक्यातील करकंब गावामध्ये एक आणि पंढरपुरात एक असे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावरील काही भाग प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.

पंढरपूर शहरातील रुग्ण एका नामांकित बॅंकेचे संचालक असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ :

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला असला तरी बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या चरणी संतांच्या पादुका अर्पण होण्याची अखंडित परंपरा कायम राहणार आहे.

सरकारकडून या वारीसाठी काही नियम देण्यात आले आहेत. बसने जाणाऱ्या संतांच्या पालख्या रस्त्यात कोठेही न थांबता पंढरपूरसाठी  प्रस्थान करतील. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज आणि संत चांगावटेश्वर यांच्या पालख्या मंगळवारी पंढरपूरला प्रस्थान करणार आहेत.

प्रत्येक पालखीसोबत बसमधून केवळ वीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच पालखी रस्त्यात दर्शनासाठी थांबवता येणार नाही. पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत कोरोना टेस्ट करणं बंधनकारक आहे.

सरकारकडून प्रत्येक पालखीसाठी इन्सिडेंट कमांडर म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. इन्सिडेंट कमांडर पादुका प्रस्थान केल्यापासून प्रस्थानच्या ठिकाणी पुन्हा येईपर्यंत पालखीसोबत राहणार आहे.

पालखीत साठ वर्षावरील वारकऱ्यांना मनाई आहे. बससोबत पुढे आणि मागे बंदोबस्त करणारी वाहने असणार आहेत. पंढरपूर आणि पुन्हा पंढरपूरपासून देवस्थानापर्यंत सोबत राहणार आहेत. बस मधून जाणाऱ्या वारकर्‍यांची यादी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना पाठवणं आवश्यक आहे. (Pandharpur Corona Patient found ahead of Ashadhi Ekadashi)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.