पुण्यात पेटीएम केवायसी अपडेटच्या नावाखाली 15 जणांची फसवणूक, साडेतीन ते चार लाखांचा गंडा

नाताळ आणि थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये सध्या सर्वजण व्यस्त (paytm fraud pune) आहेत. अशा परिस्थितीत पेटीएम आणि एटीएमने आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

पुण्यात पेटीएम केवायसी अपडेटच्या नावाखाली 15 जणांची फसवणूक, साडेतीन ते चार लाखांचा गंडा
Follow us
| Updated on: Dec 28, 2019 | 8:12 AM

पुणे : नाताळ आणि थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये सध्या सर्वजण व्यस्त (paytm fraud pune) आहेत. अशा परिस्थितीत पेटीएम आणि एटीएमने आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुण्यात पेटीएम केवायसी अपडेट्सच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. तर एटीएमला स्कीमर लावून पैसे काढण्याच्या घटना वाढल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेटीएम आणि एटीएम वापरताना सावधानता बाळगणे गरजेचे (paytm fraud pune) आहे.

तुम्ही पेटीएम वापरताय किंवा केवायसी अपडेट करत असाल तर सावधान… कारण तर तुम्हाला चुना लागण्याची शक्यता आहे. पुण्यात केवायसी अपडेटच्या नावाखाली पंधरा जणांची फसवणूक झाली आहे. या भामट्यांनी ग्राहकांना तब्बल साडेतीन ते चार लाखांचा गंडा घातला आहे. त्यामुळे अशापासून सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

राज्यासह देशभरात सध्या ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टचा फीवर आहे. अनेक जण मित्रमंडळी आणि परिवारासह पर्यटनस्थळी जाऊन मजामस्ती करत आहेत. त्यातच अनेक बँकांना सुट्ट्या असल्यानं एटीएम आणि पेटीएममधून आर्थिक व्यवहार होत आहे. अशा परिस्थितीत एटीएमला स्कीमर आणि कॅमेरा लावून गंडा घालण्याची शक्यता वर्तवली जात (paytm fraud pune) आहे.

पुण्यातील गायत्री सातपुते या महिलेला पेटीएम ब्लॉक झालं होतं. तिला केवायसी अपडेटसाठी फोन करुन गंडा घातल्याची घटना घडली आहे. राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीने नोएडातून फोन केला. यावेळी केवायसीची माहिती घेताना त्यांना पासवर्ड आणि इतर माहिती घेऊन 15 हजार लुबाडले. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

थर्टीफर्स्ट आणि सुट्ट्यांचा काळ असल्याने सध्या सर्वजण पेटीएम आणि एटीएमचा वापर करत आहे. हीच संधी भामट्यांनी पेटीएम ग्राहकांना लक्ष केले आहे. त्यामुळे पेटीयम आणि एटीएम व्यवहार करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला जुना पिन क्रमांक बदलणेही तितकेच गरजेचे आहे.अन्यथा तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार (paytm fraud pune) नाही.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.