AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : सीएए आणि एनआरसीच्या भीतीने बुलडाण्यात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी हाकलून लावले

मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरातून शासकीय यंत्रणांना स्थानिक नागरिकांनी हाकलून (Buldana corona virus case) लावले.

Corona : सीएए आणि एनआरसीच्या भीतीने बुलडाण्यात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी हाकलून लावले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Apr 01, 2020 | 9:18 AM
Share

बुलडाणा : मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरातून शासकीय आणि वैद्याकीय यंत्रणांना स्थानिक नागरिकांनी हाकलून (Buldana corona virus case) लावले. सीएए आणि एनआरसी संबंधित हा सर्व्हे सुरु असल्याच्या अफवेने सर्वेक्षण करण्यास स्थानिकांना नकार दिला. स्थानिक नागरिक सहकार्य करत नसल्याने प्रतिबंधाला अडचणी येत असल्याचे वैद्यकीय तपासणी करणाऱ्या (Buldana corona virus case) अधिकाऱ्यांनी सांगितले.

बुलडाणा शहरामध्ये ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला त्या परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी आणि नोंद करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने 500 मीटरचा विभाग सील केला आहे. या भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणीकरीता तेथे काही कर्मचारी गेले असता त्यांना त्या ठिकाणावरून हाकलून लावल्याचा प्रकार घडला. सीएए आणि एनआरसीचा सर्व्हे सुरु असल्याची अफवा येथे पसरवल्यामुळे नागरिकांनी सर्व्हेक्षणास विरोध केला.

ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेथे वैद्यकीय तपासणी आणि सर्व्हेक्षण करण्यासाठी 65 जणांचे पथक तयार केले आहे. मात्र काल (31मार्च) दुपारी तपासणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी सहकार्य  न करता असभ्य वागणूक देऊन परिसरातून हाकलून दिले. काही नागरिकांनी तर अपशब्दही वापरले. या परिसरातील नागरिकांना कोणीतरी सीएए आणि एनआरसीचा सर्व्हे असल्याची अफवा पसरवल्याने हा प्रकार घडला.

हा असा प्रकार घडत असल्याने प्रशासनाला प्रतिबंधक उपाय योजना करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यावर जिल्ह्या प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सर्व वैद्यकीय पथके परत जिल्हा परिषद कार्यालयात आली होती. मात्र परिसरातल्या नगरसेवक आणि समजदार व्यक्तींनी समजावून सांगितल्यावर सर्वेक्षण सुरु झाले आहे. तर नागरिकांनी सहकार्य करुन आपल्या आरोग्याची तपासणी करुण घ्यावी आणि स्वतःलाच नव्हे तर इतरांना सुद्धा वाचवावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यानी बुलढाणा शहरवासियांना केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...