AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी-चिंचवडमध्ये टिक-टॉक व्हिडीओ बनवणारे पोलिसांच्या निशाण्यावर

पिंपरी-चिंचवड: फेसबुक आणि व्हॉट्सअपनंतर आता एक नवीन फॅड नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. ते फॅड आहे व्हिडीओ अॅप्लीकेशन टिक-टॉकचं. पण या अॅप्लीकेशनमुळे तुमच्यावर अडचणीची वेळही येऊ शकते. पिंपरी-चिंचवडच्या तीन तरुणांची टिक-टॉकवर व्हिडीओ बनवत असताना चांगलीच फजीती झाली. हे तिघे एका पुलावर टिक-टॉक व्हिडीओ बनवत होते. तेव्हा त्यांच्या मागून पोलिसांची गाडी आली आणि या तिन्ही तरुणांना पोलीस […]

पिंपरी-चिंचवडमध्ये टिक-टॉक व्हिडीओ बनवणारे पोलिसांच्या निशाण्यावर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

पिंपरी-चिंचवड: फेसबुक आणि व्हॉट्सअपनंतर आता एक नवीन फॅड नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. ते फॅड आहे व्हिडीओ अॅप्लीकेशन टिक-टॉकचं. पण या अॅप्लीकेशनमुळे तुमच्यावर अडचणीची वेळही येऊ शकते. पिंपरी-चिंचवडच्या तीन तरुणांची टिक-टॉकवर व्हिडीओ बनवत असताना चांगलीच फजीती झाली. हे तिघे एका पुलावर टिक-टॉक व्हिडीओ बनवत होते. तेव्हा त्यांच्या मागून पोलिसांची गाडी आली आणि या तिन्ही तरुणांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं. पिंपरी चिंचवडच्या पुलावरचा मनोरंजनाचा हा प्रकार पोलीस स्टेशनच्या पायरी पर्यंत गेला.

फेसबुक, इंस्टाग्राम प्रमाणेच टिक-टॉक अॅप्लीकेशनने तरुण-तरुणींना अक्षरशः वेड लावलेलं बघायला मिळते. टिकटॉकवर अकाउंट उघडून तरुण-तरुणी डंबिंग व्हिडीओ तयार करतात. यावर लाईक्स अन कमेंट्सचा भडीमार होतो. तेच व्हिडीओ इतरांच्या व्हाटसअॅप-फेसबुकच्या स्टेटसवर झळकतात, व्हायरल ही होतात. याचं फॅड दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

खर्चासाठी पैसे देत नसल्याने, टिकटॉक व्हिडीओचा आधार घेत पत्नीने पतीला कॅन्सर झाल्याची अफवा पसरवली. टिकटॉकवरील हीच बदनामी जिव्हारी लागल्याने पतीने आत्महत्या केल्याचं प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच घडलं.

याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून टिकटॉकवर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह व्हिडीओ टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे, वेळ पडल्यास अटक करण्याचे आदेश ही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

सोशल मीडियावर कोणी कसे व्हिडीओ बनवावे याचं स्वातंत्र्य असलं तरी यातून कुणाची बदनामी करण्याचा अधिकार कुणालाच नाही. तरीही तुम्ही असं काही केलं, तर पोलीस तुम्हाला बेड्या ठोकतील हे मात्र नक्की. तेव्हा यापूढे टिक-टॉक व्हिडीओ बनवताना काळजी घ्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...