AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लस येताच प्रत्येक भारतीयापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याची तयारी : नरेंद्र मोदी

कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची जलदगतीने तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

कोरोना लस येताच प्रत्येक भारतीयापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याची तयारी : नरेंद्र मोदी
| Updated on: Oct 20, 2020 | 6:40 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांच्या काळात भारताने कोरोनावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवलं आहे. मात्र पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत लढाई कमकुवत होऊ देऊ नका, असं सांगत कोरोनाची लस जेव्हा येईल तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारची जलदगतीने तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. (Pm Narendra Modi on Corona vaccine)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा, असं आवाहन त्यांनी केलं.

‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’, असं सांगत जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत कोणतीही हयगय करू नका. कोरोनाच्या लशीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून लवकरच ही सर्वांना मिळेल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिला.

“सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. पण घराबाहेर पडताना काळजी घ्या. आपण लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. पण याचा अर्थ देशातून कोरोनाचं संकट गेलं असं होत नाही. कोरोनाचं संकट कायम आहे. कोरोना गेला अशी समजूत करण्याची किंवा कोरोनापासून धोका नाही, असं मानण्याची ही वेळ नाही. अनेकांनी सावधानता बाळगणं बंद केल्याचे व्हिडीओ मी पाहिले, बेपर्वा वर्तनामुळे स्वतःच्याच कुटुंबाला संकटात टाकू नका”, असं आवाहन मोदींनी केलं.

“आपल्याकडे 90 लाखापेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत. तसंच 12 हजार क्वारंटाईन सेंटर आहेत. 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु आहे तर देशातील चाचण्यांची संख्या लवकर दहा कोटींच्या वर जाईल”, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

“अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी होता-होता चिंताजनक पद्धतीने वाढली. त्या तुलनेत जगातील विकसित देशांपेक्षा जास्त नागरिकांना वाचवण्यात भारताला यश आले. भारतात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यूदर 83 आहे तर अमेरिका, ब्राझिल, ब्रिटनसारख्या देशात 600 पार मृत्यूदर गेलाय”, असं सांगायला देखील मोदी विसरले नाहीत. (Pm Narendra Modi on Corona vaccine)

संबंधित बातम्या

कोरोनाचं संकट कायम, जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही : पंतप्रधान मोदी

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.