ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला मुलाची मिठी, इमोशनल व्हिडीओ व्हायरल

मुंबई : कोणताही सण-उत्सव असो, पाऊस असो, उन्हाळा असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, पोलीस सदैव आपल्या सेवेत हजर असतात. पण या पोलिसांनाही कुटुंब असतं. पोलीस ड्युटीवर निघताना त्याच्या मुलांची परिस्थिती काय होते, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत पोलिसांच्या कामाला सॅल्युट केलाय. ट्विटरवर शनिवारी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. […]

ड्युटीवर निघालेल्या पोलिसाला मुलाची मिठी, इमोशनल व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : कोणताही सण-उत्सव असो, पाऊस असो, उन्हाळा असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, पोलीस सदैव आपल्या सेवेत हजर असतात. पण या पोलिसांनाही कुटुंब असतं. पोलीस ड्युटीवर निघताना त्याच्या मुलांची परिस्थिती काय होते, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत पोलिसांच्या कामाला सॅल्युट केलाय.

ट्विटरवर शनिवारी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी ड्युटीवर निघाला आहे, पण त्याचा मुलगा पायाला मिठी मारुन जोरात रडतोय. बाप मुलाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण जोरात रडत असलेला हा चिमुकला बापाला सोडण्यासाठी तयार नाही. अत्यंत भावूक परिस्थिती या व्हिडीओतून दिसत आहे.

1.25 सेकंदाचा हा व्हिडीओ आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केलाय. हा पोलिसांच्या नोकरीतील अत्यंत भावूक क्षण आहे. मोठ्या घाई व्यस्ततेमध्ये बहुतांश पोलिसांना याच परिस्थितीचा सामना करावा लागतो, असं कॅप्शन या व्हिडीओला आयपीएस अधिकाऱ्याकडून देण्यात आलंय.